Shani Dosh Upay : दसरा (Dussehra 2025)म्हणजेच विजयादशमीचं हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा (Dasara 2025) साजरा करतात. हा दिवस वाईटावर चांगल्याचं प्रतीक मानला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि संबंधित काही दोष असतील तर दसऱ्याचा दिवस तुमच्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे. या शनि दोष (Shani Dev) दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकता. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.
शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी करा 'हा' उपाय
ज्या लोकांच्या कुंडलीत शनि दोष आहे त्यांनी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी. या व्यतिरिक्त घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं रोप लावा. असं म्हणतात, यामुळे शनि दोष दूर होतो.
भगवान हनुमानाची पूजा (Lord Hanuman Puja)
ज्योतिष शास्त्रानुसार, जे लोक भगवान हनुमानाचे भक्त आहेत त्यांनी या दिवशी नियमित हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्यास शनी दोष लागत नाही.
तेलाचा दिवा
ज्या लोकांच्या कुंडलीत शनीशी संबंधित काही दोष असतील किंवा जर शनीची साडेसाती किंवा ढैय्याने पिडीत असाल तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिच्या कष्टापासून मुक्ती मिळते.
नारळाचा उपाय (Coconut Upay)
नारळाला हिंदू धर्मात फार शुभ मानलं जातं. दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करताना एक पाणी असणारा नारळ तुमच्या डोक्यावरुन 21 वेळा उतरवून टाका. असं म्हणतात हा उपाय केल्यास शनि दोषापासून मुक्ती मिळते.
रामचरितमानसचं पठण करा (Ramcharitmanas)
जर तुमच्या कुंडलीतील शनि दोषापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घरात बसून सुंदरकांड किंवा रामचरितमानसचं पठण करु शकता. हे करणं फार शुभ मानलं जातं.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
