Ravi Kishan on Dada Kondke: 'कोण होणार मराठी करोडपती' (Kon Honaar Marathi Crorepati) या शोमध्ये आतापर्यंत दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. दरम्यान, आता या शोच्या विशेष भागात गोरखपूरचे खासदार आणि अभिनेता रवि किशन (Ravi Kishan) यांनी शोमध्ये हजेरी लावली. सूत्रसंचालक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासोबत गप्पा मारताना रवि किशन यांनी अनेक किस्से शेअर केले. सोशल मीडिया सेन्सेशन ते रातोरात इंटरनेटवर मिळालेली प्रसिद्धी यावर त्यांनी भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे रवि किशन यांनी दिवंगत अभिनेते आणि विनोदवीर दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या विनोदावर भरभरुन गप्पा मारल्या. इतकंच नाही तर, रवि किशन 20 लिटर दुधाने आंघोळ करतात, या अफवांवरही आपले मौन सोडले आहे. 'कोण होणार मराठी करोडपती' या शोमध्ये रवि किशन यांनी अनेक रंजक किस्से शेअर केले.
दादा कोंडकेंचं रवि किशन यांच्याकडून भरभरुन कौतुक (Ravi Kishan Praises Dada Kondke on KBC)
रवि किशन यांनी अलिकडेच 'कोण होणार मराठी करोडपती' च्या सेटवर हजेरी लावली. तसेच प्रश्नांच्या खेळात उत्तरं दिली. तसेच खेळ खेळत असताना त्यांनी विविध किस्से शेअर केले. मिळालेल्या माहितीनुसार, 'कोण होणार मराठी करोडपती'चा हा एपिसोड 28 नोव्हेंबर रोजी सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं भरभरुन कौतुक केलं. दादा कोंडके यांचं कौतुक करताना रवि किशन यांनी भाबड्या नाम्या या पात्राचं कौतुक केलं. भाबड्या नाम्या एखादं वाक्य अगदी निरागसपणे बोलून जायचा. दादा कोंडके यांच्या विनोदाचं आणि डायलॉग डिलिव्हरीचंही कौतुक केलं. यावरुन रवि किशन यांना मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते दादा कांडके यांच्याप्रति विशेष प्रेम आणि आदर असल्याचं दिसून आले.
दादा कोंडके यांच्याबाबत रवि किशन म्हणाले की, 'दादा कोंडके यांच्या विनोदाचं टायमिंग अचूक असायचं. त्यांचे चित्रपट आणि विशेष विनोद हे सगळं काही वेगळं असायचं. लोकांनी त्यांच्या सिनेमांचे अनेक अर्थ काढले. परंतु, दादा कोंडके यांच्या नजरेतून पाहिल्यास, त्यांच्या प्रत्येक विनोदात समाजासाठी नेहमी एक संदेश असायचा', असं रवि किशन म्हणाले. यावेळी त्यांनी, प्रत्येक शॉटपूर्वी 20 लिटर दुधात गुलाबाच्या पाकळ्या टाकून आंघोळ करतो, या अफवेचेही खंडन केले. माहितीनुसार, हा एपिसोड 28 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार असून, या एपिसोडमध्ये आणखी कोणते किस्से पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
