Phulwara First Look: रवि जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'फुलवरा' (Phulwara) या सिनेमाची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. 2010 साली रिलीज झालेल्या 'नटरंग' या सिनेमाची बरीच चर्चा झाली. या सिनेमातील गाणी अजूनही चाहत्यांच्या ओठांवर आहे. टीझर पाहिल्यानंतर 'फुलवरा' या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. कारण सिनेमाच्या टीझरमध्ये कुणाचेही फेस रिव्हिल करण्यात आले नव्हते. दरम्यान, आता 'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. रवि जाधव यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यामुळे आता अभिनेत्रींच्या (Priyadarshini Indalkar) चेहऱ्यावरुन पडदा उठला असून, या सिनेमात दोन अभिनेत्री (Vaidehi Parshurami) झळकणार असल्याची माहिती आहे. सध्या 'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्या दोन अभिनेत्री कोण? पाहूयात.
'फुलवरा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, त्या 2 अभिनेत्री कोण? (Phulwara Priyadarshini Indalkar and Vaidehi Parshurami)
'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. डोक्यावरुन पदर सारत दोन्ही अभिनेत्रींनी आपला चेहरा दाखवला आहे. रवि जाधव यांनी फर्स्ट लूक रिलीज केला आहे. ढोलकीच्या तालावर दोन्ही अभिनेत्री ठेका धरतात. लावणीचा ठसकेबाज अंदाज यातून पाहायला मिळतो. घुंगरांचा आवाज सर्वत्र घुमतो. शेवटी डोक्यावरुन पदर सारत अभिनेत्रींचे चेहरे पाहायला मिळतात. या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या दोघींच्या मुख्य भूमिका आहेत. दोघींचा कातिल अंदाज या फर्स्ट लूकमधून पाहायला मिळतो. दोघांची नृत्याची जुगलबंदी या सिनेमाच्या फर्स्ट लूकमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. दरम्यान, या अभिनेत्रींव्यतिरिक्त या सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रवि जाधव यांनी 'फुलवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये रवि जाधव यांनी लिहिलं की, 'अस्सल लावणी करतोय सादरपाठीशी उभी अंबाबाई गं! घेऊन आलोय हा फुलवरा. वाहतो तुमच्या पायी गं ! अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने सादर करीत आहोत मथुरा आणि संगीता परीतेकर यांची पहिली झलक! झी स्टुडिओज् आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित 'फुलवरा', 14 जानेवारी 2027 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !'. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु असून, या सिनेमातून प्रेक्षकांना कोणती स्टोरी पाहायला मिळणार? याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
