RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी शुक्रवार 28 जून रोजी  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी उपस्थिती लावली. मोहन भागवत यांच्या स्वागतासाठी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आधीच गेटवर उपस्थित होता आणि मोहन भागवत पोहोचताच त्यांने त्यांना नमस्कार करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. 


अनंत अंबानींच्या लग्नाआधी सर्व मोठ्या व्हीआयपींसोबत फोटोशूट सुरू आहे आणि त्याअंतर्गत मोहन भागवत  अंबानींच्या  अँटिलिया पोहोचले होते. खरंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरु आहे. याआधी अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे. 


12 जुलैला होणार लग्न, आतापासूनच सेलिब्रेशनला सुरुवात


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी होणार आहे. पण त्यासाठी आतापासूनच सेलिब्रिटींची गर्दी होऊ लागली आहे. लग्नाचा हा भव्य सोहळा यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वादाचा कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी त्यांचे रिसेप्शन पार पडणार आहे. अनंत हा मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. मुंबईतील एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत  तो लग्नबंधनात अडकणार आहे. 


जगभरातील मान्यवरांना केलं आमंत्रित 


या वर्षाच्या सुरुवातीला जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये जगभरातील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. यावेळी बिझनेस वर्ल्ड, बॉलीवूड आणि हॉलिवूडमधील स्टार्सनी सहभाग घेतला, त्यानंतर हा सोहळा अविस्मरणीय ठरला. इवांका ट्रम्प, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन हे सन्मानित पाहुण्यांमध्ये होते. पॉप सेन्सेशन रिहानाने भारतात पहिला परफॉर्मन्स दिला.                                                                                            






ही बातमी वाचा : 


Sameer Vidwans : बॉलीवूडनंतर सहजीवनाच्या संसारात मराठी दिग्दर्शकाचं पदार्पण, समीर विद्वंस अडकला लग्नबंधनात