पुणे : १८ जूनला होवू घातलेल्या १७ विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीच्या (vidhan parishad election 2026) लढती आणि बंडखोरीचं चित्र काल स्पष्ट झालं. पुण्याची जागा आधी महायुतीत ही जागा कुणाला मिळणार यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष पेटला. संख्याबळ आपल्याकडे आहे असं म्हणत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जागेची मागणी केली. पण, राष्ट्रवादीनंही जागेवरचा दावा कायम ठेवला. अखेर भाजपची ११ अमेदवारांची (vidhan parishad election 2026)यादी जाहीर झाली आणि पुणे जागा राष्ट्रवादीकडे जाणर हे स्पष्ट झालं. राष्ट्रवादीनं जागा मिळवली पण, डोकेदुखी ठरली उमेदवारी. कारण, अजित पवारांचे अत्यंत विश्वासू नेते आणि मित्र सुनील टिंगरेंनी दावेदारी सांगितलेली असताना पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडेंना उमेदवारी मिळल्याचं जाहीर झालं. काकडेंऐवजी पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी अशी एका गटाची मागणी होती. पण, पार्थ पवारांच्याच इच्छेखातर विक्रम काकडे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार बनले. त्यानंतर आज पुण्यात पार्थ पवारांनी सुनील टिंगरेंची भेट घेऊन त्यांची नाराजी संपवली त्यानंतर आता काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. या सर्व घडामोडी अन् उमेदवारीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(vidhan parishad election 2026)
Umesh Patil : पक्षाची काही रणनीती असल्याने विक्रम काकडे....
विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरती बोलताना उमेश पाटील म्हणाले की, पैशाने उमेदवारी दिली असती, तर अंबानी अदानींचे मुलं आमदार, खासदार झाले असते. पक्षाची काही रणनीती असल्याने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली असावी असंही त्यांनी म्हटलं आहे. तर वादावर बोलताना उमेश पाटील म्हणाले की, संजय काकडे यांच्याबद्दल काही अजितदादांना अनुभव आले असतील, काही मतभेद झाले असतील, त्यावेळेस काही चुकीचे कानावर आलं असेल,असंही ते पुढे म्हणालेत.
तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीतून गेलेले 90% नगरसेवक भाजपचे आहेत, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. ज्या त्या पक्षाची रणनीतीचा भाग आहे. सुनील टिंगरे बैठकीला होत. त्यांना डमी उमेदवार म्हणूनच अगोदर सांगण्यात आलेलं होतं, त्यांचा कोणी गेम केलेला नाही, पक्षाच्या उमेदवारीनंतर काही नेते नाराज होत असतात सर्वच पक्षात हे होते. पक्षाच्या कोर कमिटी मधील सगळ्या नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी ठरवली आहे, सुनेत्रा पवार यांना जरी सगळे अधिकार होते तरीही सर्वांसोबत चर्चा केली जाते, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर प्राजक्त तनपुरे यांना कोणी प्रश्न विचारत नाही, तेही काल पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली आहे, राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
vidhan parishad election 2026 : पार्थ पवार यांना टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात यश
सुनील टिंगरे यांची नाराजी अखेर दूर करण्यात आली आहे. पार्थ पवार यांना टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात यश मिळालं आहे. विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि पार्थ पवार यांची एकत्रित चर्चा झाली. जिजाई निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीत असलेल्या नाराजीवर अखेर पडदा पडला आहे. जय पवार जिजाई बंगल्यावर पोहोचले यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे यांनी म्हटलं की, पक्षाने जो निर्णय घेतला आहे. तो सगळ्यांनी मान्य केला आहे. पक्ष मला कुठे ही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षात अशा वेळ येतात जेव्हा काही निर्णय घ्यावे लागतात. संजय काकडे यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांना अधिकार आहे पक्ष कार्यालयात यायचा, मला कोणाचा ही फोन आलेला नाही. मी दादांचा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो. पुढील काळात योग्य तो सन्मान राखला जाईल असं मला सांगितलं असल्याचं सुनील टिंगरे म्हणालेत. सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झाली आहे. पार्थ पवार यांना टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि पार्थ पवार यांची एकत्रित चर्चा झाली आहे, जिजाई निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीत असलेल्या नाराजीवर अखेर पडदा पडला आहे.
