Ras Pyayla Ye Mhanal May or Shaky ek number tuzi kambar : सोशल मीडियावर सध्या ग्रामीण भागातील मराठी गायकांच्या गाण्यांनी धुमाकूळ घातलाय. मराठीतील अहिराणी गायक सचिन कुमावत (Sachin Kumavat) याचं 'रस प्यायला ये म्हणलं माय' (Ras Pyayla Ye Mhanal May) आणि संजू राठोडचं (Sanju Rathod) 'एक नंबर तुझी कंबर' (ek number tuzi kambar) ही दोन गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत. 

सचिन कुमावतच्या 'रस प्यायला ये म्हणलं माय' या गाण्याच्या माध्यमातून मोगरा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे. सचिन कुमावतने तृतीयपंथीयाला संधी देऊन या गाण्याची निर्मिती केली आहे. 'रस प्यायला ये म्हणलं माय' हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे.  सचिनने यापूर्वी गायलेली अनेक गाणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. 'केसावर फुगे' त्याच्या गाण्याला महाराष्ट्राने तुफान प्रतिसाद दिला होता.

दरम्यान, सचिन कुमावत प्रमाणेच संजू राठोडच्या गाण्याला देखील महाराष्ट्राने तेवढचं प्रेम दिलंय. सुरुवातीला 'गुलाबी साडी' आणि नंतर 'नको मला बंगला नको'या गाण्यांतून प्रसिद्धीस आलेल्या संजू राठोडचं सध्या 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडला आहे. 

'रस प्यायला ये म्हणलं माय' की 'एक नंबर तुझी कंबर' यूट्यूबवर कोणत्या गाण्याला जास्त views?

संजू राठोड आणि सचिन कुमावत या दोघांच्या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. मात्र,यूट्यूबवर संजू राठोडच्या  'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याने जास्त व्ह्यूज मिळवले आहेत की सचिन कुमावतच्या 'रस प्यायला ये म्हणलं माय' या गाण्याने? जाणून घेऊयात... 

संजू राठोडचं  'एक नंबर तुझी कंबर' म्हणजेच Shaky हे गाणं 22 एप्रिल 2025 रोजी यूट्यूबवर रिलीज झालं होतं. आत्तापर्यंत या गाण्याला (बातमी लिहित असताना) 13,807,227  (तेरा लाख आठ हजार सातशे सत्तावीस.) इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

सचिन कुमावतचं 'रस प्यायला ये म्हणलं माय' हे गाणं 23 एप्रिल 2025 यूट्यूबवर रिलीज झालं होतं. आत्तापर्यंत या गाण्याला (बातमी लिहित असताना) 11,279,386 (अकरा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे छप्पन्न) इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

म्हणजेच सध्या तरी यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संजू राठोडच्या 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याने सचिन कुमावतच्या 'रस प्यायला ये म्हणलं माय'या गाण्याला मागे टाकलेलं पाहायला मिळत आहे. मात्र, दोन्ही गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून दोन्ही गायकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय.  

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लहानपणी लाजाळू, अनाथ आश्रमात वाढली, कारखान्यातही काम केलं, marilyn monroe च्या आयुष्यातील 10 रहस्य