मुंबई : 'इथे आत्ता सिस्टिमचा भाग असणारे बरेच निर्माते, दिग्दर्शक आधी आऊटसायडर होते. ते तेव्हा आले, त्यांनी इंडस्ट्रीने आपलं मानलं म्हणून ते आता या सिस्टिमचा भाग झाले. असं असूनही सतत इंडस्ट्रीला बोलत राहणं म्हणजे हिप्पोक्रसीची हद्द झाली', अशा आशयाचं वक्तव्य पोस्ट करत अभिनेता रणवीर शौरीने या नेपोटिझम आऊटसायडरच्या वादात उडी ठोकली. अर्थात त्याने या ट्वीटमध्ये कुणाचं नाव घेतलेलं नाही. पण त्याची ही टिप्पणी झोंबली आहे ती दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपला.


रणवीरने या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. तरी त्यावर बोलताना अनुराग त्याला म्हणतो, तुला खरंच असं म्हणायचं आहे? तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते तू जरा स्पष्ट करून सांग. तू कुणाबद्दल बोलतोयस ते सांग. यावर रणवीरनेही त्याला लगेच उत्तर दिलं आहे. तो म्हणतो, मला जे म्हणायचं आहे ते मी पुरेशा स्पष्टतेने बोललो आहे. या पलिकडे मला अधिक स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. शिवाय मला या चिखलात दगडही मारून घ्यायचा नाहीय. ही सगळी मंडळी नेमकी कुठून आलीत याचं स्मरण मी त्यांना करून देतो आहे, असं तो म्हणतो.


अनुरागने यापूर्वीच कंगनाच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. कंगना अशी नव्हती असंही सांगितलं आहे. ते सांगतानाच मणिकर्णिका या चित्रपटानंतर ती बदलली हेही त्याने नमूद केलं आहे. एका चाहत्याला सुनावतानाही त्याने आपली बाजू मांडली आहेत तो म्हणतो, 'मेरी रोटी बॉलिवूडसे से नहीं चलती । मेरी फ़िल्म प्रोड्युस करने कोई धर्मा, एक्सेल या वायआरएफ या कोई स्टुडिओ नहीं आता, खुद नयी कंपनी बनानी पड़ती है और खुद बनाता हूँ. कंगना के पास जब कोई काम नहीं था तब क्वीन बनायीं थी.





कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली.. कंगना तडकली


यापूर्वी नेपोटिझम आणि आऊटसायडर्स यांच्या वादात अनेकांची नावं आली आहेत. अगदी अलिया भट, सोनाक्षी सिन्हा, जावेद अख्तर, कंगना रनौत, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, अनुपमा चोप्रा, आदित्य चोप्रा, करण जोहर, अनुराग कश्यप अशी अनेक नावं यात आहेत. आता रणवीर शौरीने यात उडी घेतली आहे.


संबंधित बातम्या




Kangana Ranaut | जावेद अख्तर यांनी आत्महत्येची भीती दाखवली होती, कंगना रानौतचा आरोप