Ranveer Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  रणवीर सिंह  (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे. रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलेय. या रणवीरच्या न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले.  रणवीरच्या या फोटोशूटच्या विरोधात  पुण्यात तसेच चेंबूर येथे गुन्हा दाखल झाला होता. आता कोलकाता येथील (Kolkata) उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.
 
रणवीर सिंगच्या फोटोशूटविरोधात जनहित याचिका दाखल
रणवीरच्या अडचणीत आता वाढ होणार आहे असं दिसत आहे. एका रिपोर्टनुसार रणवीर सिंगच्या फोटोशूटविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे.  कोलकाता येथील वकील नाझिया इलाही खान यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. नाझियाच्या मते, रणवीर सिंगच्या या फोटोशूटचे फोटो पूर्णपणे अश्लील आहेत. या फोटोशूटचा कोलकात्याच्या अनेक लोकांवर आणि अल्पवयीन मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. 


रणवीरचे हे फोटो मासिकातून काढून टाकण्यात यावा, तसेच 23 जुलै रोजी रणवीरचे फोटोशूट करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या सर्व प्रती तात्काळ जप्त करण्यात याव्यात. एवढेच नाही तर रणवीर सिंगचे हे फोटो कोलकात्याच्या सर्व वेबसाईटवरून ब्लॉक करावेत, असं मत या जनहित याचिकेतून नाझिया यांनी मांडले आहे.


रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केले.रणवीरचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये रिलीज करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा रिलीज करण्यात येणार होता. त्यामुळे फोटोशूटचे फोटो उशीरा रिलीज करण्यात आले. रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी,सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केले होते. 


रणवीरचे आगामी चित्रपट
रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या त्याचा सर्कस हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं आहे. 


हेही इतर सविस्तर: