Ranveer Allahbadia New Podcast: युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया (Youtuber Ranveer Allahbadia) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत सापडला आहे. अशातच आता रणवीरनं सगळं मागे सोडून नव्यानं सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यानं स्वतः सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट केली होती. रणवीरनं पुन्हा एकदा आपलं पॉडकास्ट (Ranveer Allahbadia Podcast) सुरू केलं असून वादानंतरचं आपलं पहिलं पॉडकास्ट त्यानं युट्यूब चॅनलवर शेअर केलं आहे. यामध्ये रणवीर अलाहाबादिया बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याशी बातचित करताना दिसत आहे. 'इंडियाज गॉट लेटंट' शोमधल्या वाद-विवादानंतर रणवीरचं हे पहिलंच पॉडकास्ट आहे. 

सोमवारी रणवीरच्या युट्यूब चॅनेलवर एक नवं पॉडकास्ट शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये तो बौद्ध भिक्षू पालगा रिनपोछे यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोच्या वादानंतरची ही त्याची पहिलीच मुलाखत आहे. फक्त 10 तासांत याला 2,51,401 व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनीही रणवीरच्या कमबॅकचं स्वागत केलं आहे. 

रणवीर अल्लाहबादियाच्या यूट्यूब चॅनेलचे 1 कोटी 4 लाख सबस्क्राइबर्स आहेत. त्यानं त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ अपलोड केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय की, पहिला नवा पॉडकास्ट आला आहे. एका बौद्ध भिक्षूशी मनापासून संवाद. पालगा रिनपोछे... 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वादात सापडलेल्या रणवीरनं सुमारे दीड महिन्यानंतर त्याचा पॉडकास्ट रिलीज केला आहे, ज्यामध्ये त्यानं त्याच्या आयुष्यातील आव्हानात्मक वास्तवाचाही उल्लेख केला आहे.

पॉडकास्टमध्ये, रणवीरनं पालगा रिनपोछे यांच्यासोबतच्या भेटीची आठवण करुन दिली आणि म्हटलं की, त्यांनी त्याला शहाणपण आणि करुणेच्या मिलनाचा खरा अर्थ शिकवला. त्यानं बौद्ध भिक्षूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पालगा रिनपोछे म्हणतात, 'तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या कामाबद्दल मी आभारी आहे, ज्याचा या व्यासपीठाच्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. अनेक जाणकार लोकांनी इंटरनेट, यूट्यूब, अॅप्स आणि स्पॉटीफायद्वारे त्यांचं कौशल्य इतरांसोबत शेअर केलं आहे. तुम्ही हे महान कार्य करत राहावं, अशी मी नेहमीच प्रार्थना करेन, केवळ लोकांना शिक्षितच नाही तर प्रेरणाही देत ​​राहा. तसेच, ज्ञानाचा प्रसार करत रहा. आजकाल लोकांकडे भरपूर ज्ञान आहे, पण त्यांना प्रेरणेचा अभाव आहे. तुमचं माध्यम या बाबतीत खूप उपयुक्त ठरलं आहे. मी तुम्हाला हे चांगलं काम सुरू ठेवण्याची विनंती करतो.

रणवीरकडून वादानंतरच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आव्हानांचा उल्लेख 

रणवीर अलाहाबादिया म्हणाला की, "साहेब, आपण आयुष्यात आधी दोनदा भेटलो आहोत आणि जेव्हा मी अडचणीत होतो, तेव्हा तुम्ही नेहमीच माझ्या मदतीला आला आहात. जेव्हा माझं वास्तव कठीण परिस्थितीला तोंड देत आहे... आज, मी एका मोठ्या आव्हानाला तोंड देत आहे, ज्याचा सामना मी कधीही करेन, असा विचार मी कधीही केला नव्हता, म्हणून मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, तुम्हाला भेटून आनंद झाला."  

रणवीरला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला 

रणवीर विनोदी कलाकार समय रैनाच्या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. त्यानं एका स्पर्धकाला पालकांबद्दल एक अश्लील प्रश्न विचारला, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. गुन्हे दाखल करण्यात आले. रणवीरनं दोनदा माफीही मागितली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection: 'सिकंदर'च्या वादळात 'छावा'ची नाव पार; विक्की कौशलचा चित्रपट 600 कोटींच्या जवळ, 46व्या दिवशी किती कमावले?