Ranu Mandal : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) ब्लॉक बस्टर हिट ठरला आहे. चित्रपटातील गाणीही तितकीच हिट झाली आहेत. विशेषतः ‘श्रीवल्ली’ (Srivalli) या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष जादू केली आहे. इंस्टाग्रामवर ट्रेंड होत असलेल्या या गाण्यावर रील बनण्यात चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील पुढे आहेत. अल्लू अर्जुनच्या या गाण्यातील स्टेपने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या गाण्याची हूकस्टेप आता ट्रेंड झाली आहे.


दरम्यान, ‘तेरी मेरी कहानी’ फेम गायिका रानू मंडलचा (Ranu Mandal) व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रानू या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. मात्र, यावेळीही तिला गाण्याच्या स्टेप्स फॉलो करणं जमलेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला आता चाहत्यांनीही ट्रोल करायला सुरुवात केली आहे.


पाहा व्हिडीओ :



सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू मंडल खूप मजेदार स्टेप्स करताना दिसत आहे. निळा टी-शर्ट, लाल साडी, हातात काठी आणि गळ्यात ‘गमछा’ अशा भन्नाट लूकमध्ये, या गाण्यावर रानूचा डान्स पाहून नेटकरी मात्र तिला ट्रोल करत आहेत. या आधी गाण्याच्या प्रमोशन दरम्यान, रानू मंडलने चेहऱ्यावर ओव्हर मेकअप केला होता, ज्यामुळे लोकांनी तिला जोरदार ट्रोल केले होते.


रातोरात बदलले होते नशीब!


काळ बदलायला खरोखरच वेळ लागत नाही. कधीकाळी रानू रेल्वे स्टेशनवर बसून गाणी म्हणायची. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर गायक हिमेश रेशमियानेही आपल्या चित्रपटात तिला गाण्याची संधी दिली. त्यादरम्यान रानू देखील खूप चर्चेत होती. पण, काळ बदलला आणि रानू अवस्था पूर्वीसारखीच झाली. आता रानू मंडलवर बायोपिक बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री इशिका डे रानूची भूमिका साकारणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha