Ranbir Kapoor: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे चाहत्यांनां कायम एकमेकांची कोणती ना कोणती गोष्ट सांगत चर्चेत असतात. आपल्या मुलीमुळंही सध्या हे बॉलिवूडचं जोडपं चांगलंच चर्चेत आहे.आता तर रणबीरनं चाहत्यांसह नेटकऱ्यांना संधीच दिली आहे. आलियाला मी पहिल्यांदा भेटलो तेंव्हा तिला सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार अभिनेता किशोर कुमार कोण हे माहित नसल्याचं त्यांनं सांगितलंय. सध्या पणजीमध्ये सुरु असलेल्या इफ्फी चित्रपट महोत्सवात रणबीर बोलत होता.

Continues below advertisement

काही महिन्यांपूर्वी आलिया भट्टनं ती लीपस्टीक कशी लावते असं एका व्हिडिओत दाखवलं होतं. यात ती तिच्या लिप्स्टीक लावण्याच्या वेगळ्या सवयीबद्दलही सांगताना दिसते. या व्हिडिओत रणबीरविषयी तिनं सांगितलं, जेंव्हा जेंव्हा ती लिपस्टीक लावते तेंव्हा रणबीर तिला लिपस्टीक पुसुन टाकायला सांगतो. त्याला आलियाच्या नैसर्गिक ओठांचा रंग आवडतो असं तिनं यात म्हटलं होतं.यावर सोशल मीडियावर रणबीरला नेटकऱ्यांनी टॉक्सिक म्हणून ट्रोल केल्याचं दिसलं होतं. आता इफ्फीत रणबीरच्या वक्तव्यावर नेटकरी आता आलियाच्या लिपस्टीकच्या 'वाईप इट आऊट' व्हिडिओचा बदला घेतल्याचं लिहित ट्रोल करत असल्याचं दिसतंय. एकानं लिहिलं रणबीर आणि आलिया कोण कोणाला लाज आणेल अशा स्पर्धेत आहेत. दोन्ही नवरा बायको एकमेकांचा बदला घेतायत..असं लिहिलं.

काय म्हणाला रणबीर?

मी जेंव्हा आलियाला भेटलो तेंव्हा तिनं मला विचारलं होतं किशोर कुमार कोण आहेत? तर आयुष्याचं वर्तुळ असं असतं. लोक कलाकारांना विसरतात. मग नवे कलाकार येतात. त्यामुळे आपली मुळं लक्षात ठेवायला हवीत असं रणबीर या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. राज कपूर यांचा वारसा चालवणाऱ्या रणबीरनं इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये राज कपूर यांनं त्यांचे चित्रपट, सिनेमाच्या विचारावर प्रकाश टाकला.

Continues below advertisement

 

व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी रणबीर आलियाला केलं ट्रोल

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटस या व्हिडीओवर केल्या आहेत. आता घरी गेल्यावर भांडी वाजणार असं एकानं लिहिलंय तर एकानं जेंव्हा एका नात्यात तुम्ही तुमच्या पत्नीपेक्षा दहा वर्षांनी मोठे असता तेंव्हा असे प्रसंग येतात असं एकानं लिहिलंय. अनेकांनी रणबीरला बायकोचा अपमान केल्याबद्दल ट्रोल केलंय. अनेकांनी या दोघांची भेट आलिया ९ वर्षांची असताना झाली होती.त्यामुळं तिला कसं माहित असेल असं म्हणत आलियाची बाजू घेतल्याचं दिसतंय.