Salman Khan In Ram Role: सध्या बॉलिवूडचा (Bollywood Movies) आगामी 4000 कोटींचा सिनेमा 'रामायण' चर्चेत आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमातील अनेक कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आल्यापासूनच अनेकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 2026 च्या दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या या मेगा बजेट चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. पण, याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे की, 'रामायण' सिनेमा तयार करण्याचा प्रयत्न तब्बल 30 वर्षांपूर्वीही करण्यात आलेला. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यावेळी 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी सलमान खानची (Salman Khan) निवड करण्यात आली होती. 

Continues below advertisement

सलमान खान साकारणार होता, प्रभू श्रीराम! 

90 च्या दशकाच्या सुरुवातीला सोहेल खान 'रामायण' मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी करत होता. 'औजार' सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर, सोहेल खाननं या पौराणिक चित्रपटावर काम करायलाही सुरुवात केली होती. त्यानं या चित्रपटात भगवान रामच्या भूमिकेसाठी त्याचा भाऊ सलमान खानला साईन केलं होतं, तर सोनाली बेंद्रेला सीतेच्या भूमिकेसाठी नक्की करण्यात आलेलं. अभिनेत्री पूजा भट्ट देखील या चित्रपटाचा एक भाग होती आणि शूटिंग जोरात सुरू होतं. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचं सुमारे 40 टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं आणि सलमाननं चित्रपटाचं प्रमोशन देखील सुरू केलं होतं.

नंतर आला एक मोठा ट्विस्ट...

'रामायण'च्या शूटिंगदरम्यान, सोहेल खान आणि पूजा भट्ट एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांचं अफेअर सुरू झालं. 1995 मध्ये एका मुलाखतीत बोलताना पूजा भट्टनं सोहेल खानसोबत लग्न करणार असल्याचंही सांगितलं होतं. पण, ज्यावेळी सलीन खान यांना सोहेल आणि पूजाच्या नात्याबाबत कळालं, त्यावेळी त्यांनी सोहेलला पूजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मात्र, सेटवरचं वातवरण पूर्णपणे बदलून गेलं. 

Continues below advertisement

सोहेल आणि पूजाच्या नात्यात तफावत दिसू लागली आणि शेवटी पूजा भट्टनं चित्रपटातून माघार घेतली. यामुळे संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आणि सलमान खान स्टारर हा बिग बजेट चित्रपट अपूर्चण राहिला. सलमान खाननं प्रोजेक्ट वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं केलेले प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत आणि चित्रपट कधीही पूर्ण होऊ शकला नाही.

आता तेच 'रामायण' परत येतंय...

आता सुमारे 30 वर्षांनंतर, तेच रामायण एका नव्या अवतारात परतत आहे आणि यावेळी ते पूर्वीपेक्षाही भव्य आहे. 'दंगल' आणि 'छिछोरे' सारखे हिट सिनेमे देणारे नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा आणि यश यांनी संयुक्तपणे केली आहे.

'रामायण'मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे, तर साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीला आणि दुसरा भाग 2027 च्या दिवाळीला. निर्माते नमित मल्होत्रा यांच्या मते, चित्रपटाचं बजेट सुमारे 4000 कोटी रुपये (500 दशलक्ष डॉलर्स) आहे, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट बनेल. हा चित्रपट ड्यून, मॅट्रिक्स आणि हॅरी पॉटर सारख्या हॉलिवूड चित्रपटांशी देखील स्पर्धा करेल.

दरम्यान, सलमान खान त्याच्या आगामी सिनेमासाठी मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान खानचा आगामी सिनेमा 'बॅटल ऑफ गलवान' येणार आहे. 2020 मध्ये भारतीय सैन्यदलाचे जवान आणि चिनी सैनिक यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर आधारित आहे. सलमान खान यामध्ये 'कर्नल संतोष बाबू' यांची भूमिका साकारणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Adinath Kothare In Ramayana Movie: कन्फर्म! रणबीर कपूर स्टारर 'रामायण'मध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका