Adinath Kothare In Ramayana Movie: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमाची (Ramayana Movie) चर्चा केवळ भारतच नाहीतर संपूर्ण जगभरात सुरू आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून 'रामायण' चर्चेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सिनेमात बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर (Bollywood Actor Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामाच्या (Shri Raam) भूमिकेत दिसणार आहे. तर, साऊथ सुपरस्टार साई पल्लवी (South Superstar Sai Pallavi) सीता मातेची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांत सिनेमाची स्टारकास्ट, त्यातल्या महत्त्वाच्या भूमिकांबाबत खुलासा झाला होता. अशातच भगवान रामचा धाकटा भाऊ, भरतची भूमिका कोण साकारणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. पण, आता भरतच्या भूमिकेबाबतही महत्त्वाचा खुलासा झाला असून या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्याचं नाव निश्चित झालं आहे.
बहुचर्चित 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामांचा भाऊ भरताची भूमिका एक मराठमोळा अभिनेता (Marathi Actor) साकारणार आहे. एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्यानं स्वतः याबाबत खुलासा केला आहे. 'रामायण' हा महत्त्वाचा प्रोजेक्ट असून तो जागतिक स्तरावरही महत्त्वाचा ठरेल, असं मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं आहे. 'रामायण' सिनेमात भरताच्या भूमिकेत झळकणाऱ्या मराठी अभिनेत्याचं नाव आहे, आदिनाथ कोठारे (Adinath Kothare). याआधीही या भूमिकेसाठी आदिनाथ कोठारेच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती, पण त्यावेळी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता एका मुलाखतीत बोलताना त्यानं स्वतःच याची पुष्टी केली आहे.
हा एक आशीर्वाद : आदिनाथ कोठारे
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला की, "हा एक आशीर्वाद आहे. हा भारतीय भूमीवर बनलेला सर्वात मोठा चित्रपट आहे. आज जागतिक स्तरावर बनलेल्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी हा एक आहे. याचा भाग असल्यामुळे मी खरोखरच मुकेश छाब्रा यांचा आभारी आहे. त्यांनी माझी निवड केली आणि अर्थातच नितेश सरांनी भरतच्या भूमिकेसाठी माझी निवड केली. त्याचबरोबर नमित मल्होत्रा सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतक्या मोठ्या भूमिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवली."
नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्याबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला की, "त्या दोघांचं व्हिजन काय आहे? याबद्दल ते खूप स्पष्ट आहेत. त्यांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. त्यांनी या प्रोजेक्टच्या प्री-प्रोडक्शनसाठी जवळपास 10 वर्षे दिली आहेत. नितेश सरांनी 2016-17 पासून 'रामायण'च्या स्क्रिप्टिंगला सुरुवात केली होती. तसेच, नमित सर, प्राईम फोकस आणि नितेश सरांनी VFX वर काम सुरू केले आणि लॉकडाऊनच्या आधीच प्री-प्रोडक्शन सुरू झाले होतं...", असं आदिनाथ कोठारे म्हणाला.
दरम्यान, नितेश तिवारी 'रामायण' सिनेमा हा चित्रपट दोन भागांत बनवत आहेत. पहिला भाग 2026 च्या दिवाळीला येईल आणि दुसरा भाग 2027 च्या दिवाळीला प्रदर्शित होईल. रणबीरसोबत या चित्रपटात साई पल्लवी देखील आहे, जी सीता मातेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सनी देओल देखील आहे. जो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट आहे. या सिनेमाच्या दोन्ही भागांचं बजेट 4000 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :