Aryan Khan Funny Wedding Video Viral Moment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आहे. आर्यन खान (aryan khan joota chupai) आपल्या मित्राच्या लग्नात उपस्थित होता. यावेळी वराचा बूट पळवण्याचा प्रयत्न वधूच्या मंडळींकडून करण्यात आला. व्हायरल व्हिडीओतील आर्यन खानच्या कृतीने सर्वांना खळखळून हसवलं. या व्हिडीओत आर्यन खान आपल्या मित्राच्या बुटांची काळजीपूर्वक देखभाल करताना दिसत आहे. जेणेकरुन नवरदेवाच्या मेहुण्या त्याचा बूट चोरू शकणार नाही. यावेळी आर्यन खान पडता पडता थोडक्यात बचावतो. पण हातातून तो बूट सोडत नाही.
आर्यन खानचा मित्राच्या लग्नातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Aryan Khan Funny Video Goes Viral)
लग्नातील हा व्हिडीओ 'जेस्ट इव्हेंट्स'ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ रिया नाडकर्णी आणि माहिर मेहता यांच्या लग्नातील आहे. माहिर हा आर्यन खानचा बेस्ट फ्रेंड आहे. हा व्हिडीओ वेडिंग प्लॅनर्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 'जेव्हा नवरदेवाचा बेस्टफ्रेंड हा बॅड्स ऑफ बॉलिवूड असतो..लपून छपून केलेल्या काही गोष्टी, ड्रामेबाज स्टाईल, कानाकोपऱ्यातून घुमणारा हास्य कल्लोळ, या सगळ्यात ही केवळ एक बुटांची चोरी नव्हती, तर एक घम्माल होती'.
व्हायरल व्हिडीओमध्ये जीन्स, टी - शर्ट आणि तपकिरी जॅकेट घातलेला आर्यन, नवरदेवाचे बूट घट्ट पकडून फिरताना दिसतो आहे. तर, वधूकडचे मंडळी नवरदेवाचा बूट हिसकावण्याचा प्रयत्न करीत आहे. एका क्षणी आर्यनचा बूट पकडताना तोल जातो. पण तरीही तो मित्राचा बूट सोडत नाही. आर्यन खान नवरदेवाचा बूट घेऊन गर्दीतून पळून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, युझर्स यावर मेजशीर कमेंट्स करीत आहे. एकाने, 'आर्यनची ही बाजू पहिल्यांदाच पाहिली' , तर आणखी एकाने, 'आर्यन अगदीच वेडा आहे', असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. सध्या आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून बॉलवूडमध्ये पदार्पण (Aryan Khan Bads Of Bollywood)
आर्यनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं बॅड्स ऑफ बॉलिवूडमधून सुरूवात केली. त्यानं ही सिरीज लिहिली तसेच दिग्दर्शित केली. या सिरीजमध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सिरीजनंतर अद्याप आर्यनने आपला पुढचा प्रोजेक्ट जाहीर केलेला नाही. चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
