This Actress Was First Choice For Sita In Ramayana: सध्या रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' सिनेमाची (Ramayana Movie) जोरदार चर्चा रंगली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शिक 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका रणबीर कपूर, तर सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवी (Actress Sai Pallavi) दिसणार आहे. लीड रोलमध्ये दिसणाऱ्या या दोन स्टार्सच्या नावांची घोषणा झाल्यापासूनच चर्चांना जोरदार उधाण आलंय. तसेच, सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. असं असलं तरीसुद्धा 'रामायण' सिनेमात सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवी (Sai Pallavi) कधीच फर्स्ट चॉईस नव्हती. तिच्या ऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीनं ऑडिशनमध्ये बाजी मारुन, सर्वांची वाह वाह जिंकली होती.
दाक्षिणात्य अभिनेत्री (South Actress) श्रीनिधि शेट्टीनं (Srinidhi Shetty) नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, 'रामायण' सिनेमातल्या सीता मातेच्या भूमिकेसाठी तिनं ऑडिशन दिलेलं. मेकर्सकडूनही तिला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला. पुढे बोलताना तिनं हेदेखील सांगितलं की, तिनं ही भूमिका न करण्याचा निर्णय का घेतला? त्यासाठी फिल्मचा अभिनेताच कारणीभूत होता.
दाक्षिणात्य सिनेस्टारमुळे फिल्म सोडली
सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना श्रीनिधि शेट्टीनं सांगितलं की, तिनं 'रामायण'साठी ऑडिशन दिलेलं आणि तीन व्यवस्थित शूट केलेले सीन होते. निर्मात्यांनाही तिनं दिलेली स्क्रिन टेस्ट खूपच आवडलेली आणि तेव्हाच तिला कळालं की, दाक्षिणात्य स्टार यश सुद्धा या फिल्मचा एक भाग आहे.
'केजीएफ चॅप्टर 2' मध्ये अभिनेता यशसोबतची तिची जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांनी आधीच पाहिल्यामुळे श्रीनिधी शेट्टीनं 'रामायण'मध्ये पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची जोडी खूप सुपरहिट ठरली, त्यामुळे यश रावणाची भूमिका करत असताना सीतेची भूमिका साकारणं प्रेक्षकांना त्यांच्या यशस्वी कोलॅबोरेशननंतर इतक्या लवकर स्वीकारणं कठीण जाईल, असं तिला वाटलं. तिला वाटलं की, ते कदाचित विचित्र वाटेल. म्हणून तिनं फिल्म करायला नकार दिला आणि फिल्म साई पल्लवीच्या पारड्यात पडली.
पुढे बोलताना श्रीनिधी शेट्टीनं 'रामायण'मध्ये साई पल्लवीला माता सीतेच्या रुपात पाहिल्यानंतर तिला आनंद झाला, असं तिनं सांगितलं. तिचं म्हणणं आहे की, साई सीता मातेच्या भूमिकेसाठी उत्तम पर्याय आहे. दरम्यान, 'रामायण'बाबत बोलायचं झालं तर, नितेश तिवारीचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच, नोव्हेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :