Mind Bending Suspense Thriller Movie: सध्या सस्पेन्स, थ्रिलर मूव्ही (Suspense Thriller Movie) सर्वांना प्रचंड आवडतात. त्यात आता ओटीटीमुळे सिनेमे (OTT Movie) पाहणं सर्वांसाठी अगदी सोपं झालंय. ऑफिसला जाता-येता, प्रवासादरम्यान सिनेमे आणि सीरिज पाहणं अगदी सोपं झाल्यामुळे नेहमीच सर्वजण नवनव्या सिनेमांच्या शोधात असतात. अशातच जर सस्पेन्स, थ्रिलर मूव्हीबाबत कुणी फक्त सांगितलं तरी, तो कधी एकदा पाहून संपवतोय, असं होतं. तुम्हीही अशातच डोकं भंडावून सोडणाऱ्या सस्पेन्स, थ्रिलर सिनेमाच्या शोधात असाल तर, आम्ही तुम्हाला एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. हा सिनेमा तुम्हाला फक्त भंडावून सोडणार नाही, तर यातला सस्पेन्स आणि क्लायमॅक्स तुम्हाला खिळवून ठेवेल. या सिनेमातला सस्पेन्स अजय देवगणच्या दृश्यम सिनेमालाही मागे टाकतो. तसेच, आयएमडीबीवर या सिनेमाला टॉप रेटिंग (IMDb Movie Rating) देण्यात आलंय. 

Continues below advertisement

अजय देवगणचा दृश्यम 2015 मध्ये प्रदर्शित झाला आणि एका वर्षानंतर, 2016 मध्ये, एक सायको-थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटात आजचे दोन सर्वात लोकप्रिय स्टार आणि एक टॉपची अभिनेत्री होती. या सिनेमातले ट्विस्ट आणि टर्न्स तुम्हाला खिळवून ठेवतील.

आम्ही ज्या थ्रिलर सिनेमाबद्दल बोलत आहोत, त्यात विक्की कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, त्यावेळी विक्की कौशल आजचा सुपरस्टार नव्हता. 'मसान'नंतर त्याचं नाव चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये समाविष्ट होतं. बरं, या सस्पेन्सफुल चित्रपटाचं नाव आहे 'रमन राघव 2.0'.

Continues below advertisement

नवाजनं साकारलेली सीरियल किलरची भूमिका 

'रमन राघव 2.0'मध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनं (Nawazuddin Siddiqui) सीरियल किलर रमनची भूमिका साकारलेली. हा सीरियल किलर रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात तरुणींची शिकार करायचा. या फिल्ममध्ये विक्की कौशलनं एका पोलिसाची भूमिका साकरली आहे, जो या सीरियल किलरच्या मागावर असतो. विक्कीनं एसीपी राघवन साकारला आहे. आयएणडीबीवर 'रमन राघव 2.0'ला 7.3 रेटिंग देण्यात आलंय. ही फिल्म तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 आणि नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

फिल्मचा सस्पेन्स तुम्हाला थोडा हैराण करेल, पण एकंदरीत कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. सीरियल किलर असलेला रमन स्वतःला सरेंडर केल्यानंतर जेल तोडून पळून जाण्याचा कट रचतो आणि पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या जगतात प्रवेश करतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tamil Action Suspense Thriller Movie: 1 तास 58 मिनटांची अंगावर काटा आणणारी फिल्म, 2 हत्या अन् संशयित 25; OTT गाजवतोय 'हा' सिनेमा