Pannalal Surana Passed Away : सोलापूर जिल्ह्यातूनएकअतिशयदुःखदबातमीसमोरआलीआहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन झालेआहे. वयाच्या 93व्या वर्षी पन्नालाल सुराणा यांनी अखेरचा श्वास घेतलाय. नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे कुटुंबीयांनीत्यांना सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, संपूर्ण आयुष्य समजासाठी देणाऱ्या साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधणानंतर त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला होता. बार्शीत शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. तर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते.शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केलं आहे. त्याच्यायाअकालीनिधनाच्याबातमीनेसोलापूरसहराज्यात हळहळ व्यक्तकेलीजातआहे.

Pannalal Surana : मराठवाड्यात भुकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी 'आपलं घर', सामाजिककार्यातमोलाचावाटा

समाजसेवा आणि समाजसुधारणा यांना आयुषाचा श्वास आणि ध्यास मानलेले जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची आणीबाणीत जेल भोगलेल्या समाजवादी नेते म्हणूनदेखीलवेगळीओळखआहे. जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं सामाजिक कामही मोठं आहे. मराठवाड्यात भुकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी पन्नालाल यांनी सुरु केलेल्या आपलं घर मधून अनेक मुला-मुलींची आयुष्य घडली आहेत. त्याशिवाय भूमीहीन शेतकऱ्यांना जमीनी मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला. समाजकारण आणि राजकारणामध्ये गुंतलेल्या व्यक्तीमध्ये लेखकही दडला आहे. ग्यानबाचं अर्थकारण हे त्यांचं पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारं ठरलेय.

सत्तरहुन अधिक वर्ष ते देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाच्या स्थितंतराचे साक्षीदार राहिले आहेत. चले जाव आंदोलनपासानू ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीतील महत्वाचा अनुभव सुराणा यांच्याकडे  होता. मात्रत्यांच्यायाअकालीनिधनाच्याबातमीनेसोलापूरसहराज्यात हळहळ व्यक्तकेलीजातआहे.

इतरमहत्वाच्याबातम्या