Ram Charan Peddi Opening Day Box Office Collection: राम चरणची (Ram Charan) स्पोर्ट्स ड्रामा फिल्म (Sports Drama) 'पेद्दी' (Peddi) हा सिनेमा (Box Office Collection) या वर्षीचा बहुचर्चित चित्रपटांपैकी एक ठरलाय. 4 जून, गुरुवारी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. बुची बाबू सना दिग्दर्शित या सिनेमाची जबरदस्त अॅडव्हान्स बुकींग झाली होती. अपेक्षितप्रमाणे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या सिनेमाने रिलीज होताच अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. राम चरणच्या स्टार पॉवरच्या जोरावर या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. चला तर मग, ओपनिंग डे ला या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'पेद्दी'ने पहिल्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Peddi Box Office Collection Day 1)
राम चरण आणि जान्हवी कपूर अभिनीत 'पेद्दी' हा सिनेमा हिंदी भाषाव्यतिरिक्त इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा 5 विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाची रिलीज होण्यापूर्वीपासून प्रचंड चर्चा होती. बुधवारी या सिनेमाचा पेड प्रीव्ह्यू पार पडला. पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं 18.50 कोटींचे कलेक्शन केले. यानंतर 4 जून रोजी हा सिनेमा वर्ल्डवाइड रिलीज झाला.
क्रिटिक्स आणि प्रेक्षकवर्गाकडून या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. तसेच पहिल्या दिवशी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वांधार कमाई केली. सिनेमाच्या कलेक्शनबाबत सांगायचं झाल्यास या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
या सिनेमाने हिंदी भाषेत 3 कोटी, कन्नडमध्ये 25 लाख आणि मल्याळम भाषेत 10 लाख रुपयांचे कलेक्शन केले. तर, तामिळ भाषेत 45 लाख आणि तेलुगु भाषेत सर्वाधिक 47.20 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तसेच 'पेद्दी' या सिनेमानं पेड प्रीव्ह्यूमध्ये 18.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. म्हणजे या सिनेमानं आतापर्यंत 69.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. माहितीनुसार, 'पेद्दी' या सिनेमानं पहिल्याच दिवशी दमदार केली. तसेच 2026 च्या टॉप 10 ओपनिंग सिनेमाच्या यादीत स्थान मिळवले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
सैफ अली खानचा मुलगा रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत पिक्चर बघायला गेला; पॅपाराझी दिसताच 'तिला' लपवलं VIDEO
