Ram Charans Peddi Dominates Theatres: बुची बाबू सना दिग्दर्शित आणि राम चरण अभिनीत फिल्म 'पेद्दी'नं (Peddi) सिनेमागृहात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 4 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये (Box Office Collection) रिलीज झाला.  तर, 3 जून रोजी या सिनेमाचा (Entertainment) पेड प्रीव्ह्यू पार पडला. स्पोर्ट्स ड्रामा या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.  भारतात या सिनेमानं पहिल्याच दिवशी 50 कोटींचा आकडा पार पडला.  दरम्यान, दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.  दुसऱ्या दिवशी या सिनेमानं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले?  शुक्रवारी या सिनेमानं किती कोटींची घौडदौड केली?  जाणून घेऊयात.

Continues below advertisement

'पेद्दी' सिनेमानं दुसऱ्या दिवशी किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Peddi box office collection day 2)

'पेद्दी' नं बॉक्स ऑफिवर वर्चस्व गाजवले आहे. विशेष म्हणजे या सिनेमानं चित्रपटगृहातील नुकतेच रिलीज झालेल्या अनेक सिनेमांना पछाडलं.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं' आणि बॉबी देओल अभिनीत 'बंदर' या सिनेमांची स्पर्धा असूनही, 'पेद्दी'नं प्रेक्षकांमध्ये भुरळ घातली आहे.   हा पॅन इंडिया सिनेमा दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय राहिला आहे.   तसेच या सिनेमानं प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

सिनेमाच्या कलेक्शनबाबत सांगायचं झाल्यास,  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'पेद्दी' सिनेमानं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी  26.90 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  तसेच पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं 18.50 कोटींचे कलेक्शन केले.  तर,  ओपनिंग डेला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.   ओपनिंग डेला या सिनेमानं 51 कोटींचे कलेक्शन केले.   'पेद्दी'या सिनेमानं अवघ्या दोन दिवसांत  बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व गाजवलं आहे.   

Continues below advertisement

'पेद्दी' सिनेमानं अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार केला (Ram Charan Peddi movie latest earnings)

'पेद्दी' या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 96.40 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.  लवकरच हा सिनेमा 100 कोटी आकडा पार करणार असून,  हा चित्रपट अनेक सिनेमांचा रेकॉर्ड मोडणार यात शंका नाही.   'पेद्दी' या सिनेमाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत 50 टक्के घट झाली असली तरी, या सिनेमानं अवघ्या दोन दिवसांत 90 कोटींचा  आकडा पार केला आहे. एकूण 96.40 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.  आणखी 4 कोटींची कमाई केल्यास 100 कोटींच्या कल्बमध्ये प्रवेश करेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

परदेशातही कामाची धडपड! स्वित्झर्लंडमध्ये 'वीण दोघांतली ही तुटेना'चं शूटिंग, सुबोध भावेंचा VIDEO व्हायरल