Rakhi Sawant Warns Jaya Bachchan: जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या वक्तव्यानं सध्या बॉलिवूड (Bollywood News) इंडस्ट्री चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना जया बच्चन यांनी पॅपाराझींबद्दल एक वक्तव्य केलेलं. या वक्तव्यावेळी जया बच्चन यांनी पॅपाराझींवर (Jaya Bachchan On Paparazzi) आगपाखड केलेली आणि पॅपाराझींचा उल्लेख 'घाणेरडी टाईट पँट घालणारे उंदीर' असा केलेला. त्यानंतर, पॅपाराझींनी एकत्रितपणे बच्चन कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अशातच आता, राखी सावंत यांनी पॅपाराझींच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राखी सावंत रविवारी, 14 डिसेंबर रोजी रात्री मुंबईत 'बिग बॉस 19' च्या उपविजेत्या फरहाना भट्टच्या इव्हेंटसाठी पोहोचलेली. पण, त्यावेळी राखी सावंतनं एक निळा ड्रम घेऊन रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. राखीनं स्वतःल त्या निळ्या ड्रममध्ये लपवलेलं. त्यानंतर ती ड्रममधून बाहेर आली आणि ओरडली, "जया जी... माझ्या पापाराझींना काहीही बोलू नका. नाहीतर, मी तुम्हाला या ड्रममध्ये घेऊन जाईन."
राखी सावंतनं जया बच्चन यांच्यासाठी निळा ड्रम घेऊन आली (Rakhi Sawant Take Blue Drum For Jaya Bachchan)
याशिवाय, दुसऱ्या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणते की, "मी जया बच्चन यांच्यासाठी हा ड्रम आणला आहे. मी जया बच्चन यांना त्यावर बसवते. जर जया बच्चन माझ्या पॅप्सना काही म्हणाली तर जया... आधी तुमचे कपडे नीट करा... मग माझ्या पॅप्सना सांगा. जर आज पॅप्स इथे असतील तर ते आम्ही आहोत. मला माझ्या पॅप्सचा अभिमान आहे. लव यू..."
राखी सावंतची जया बच्चन यांना वॉर्निंग (Rakhi Sawant On Jaya Bachchan)
तिसऱ्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, "मला या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं नाही. मी फक्त जया बच्चनसाठी आलीय... जया बच्चन, तुमचा 'मिली' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मी तुमच्यावर प्रेम करते, पण जया बच्चन... कृपया माझ्या मीडियाबद्दल काहीही बोलू नका, पॅप्सबद्दल काहीही बोलू नका..."
युजर्सनी व्हिडीओंवर प्रतिक्रिया देत लिहिलंय की, "राखी सावंत देखील एक अजूबा आहे...", दुसऱ्यानं लिहिलंय की, "शेवटी, कोणीतरी बोललंच...", तर आणखी एकानं लिहिलंय की, "वाह माझी धाडसी राखी...", अजून एकानं लिहिलंय की, "हिच्यामध्ये धाडस आहे,"
लोकांनी या व्हिडीओंवर प्रतिक्रिया दिल्यात. एकानं लिहिलंय की, "राखी देखील एक आश्चर्य आहे." दुसऱ्याने लिहिले, "शेवटी, कोणीतरी बोलले." एकाने लिहिले, 'वाह माझी धाडसी राखी.' दुसऱ्याने लिहिले, "खूपच धाडसी आहे, ती कोणालाही काहीही बोलू शकते...."
महत्त्वाच्या इतर बातम्या :