Mumbai Municipal Corporation Election 2025: महायुतीमध्ये जागावाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता असतानाच, चर्चेसाठी जागावाटपाचा मुहूर्तदेखील ठरला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election 2025) जागा वाटपा संदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या, समन्वय समितीची पहिली बैठक उद्या (16 डिसेंबर) मुंबईत होणार आहे. या समन्वय समितीत भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत.
मुंबईत भाजपा दीडशे जागांवर, तर शिवसेना शंभरहून अधिक जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंगळवारच्या समन्वय समितीच्या बैठकीत, दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक वगळता, इतर जागांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरणं, पक्षीय बलाबल, गेल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा विचार करून एक अहवाल तयार करण्यात येईल आणि त्यानंतरच वरिष्ठ नेते, जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. (BMC Election 2025)
