Rakhi Sawant Creates Chaos Inside the Bigg Boss House: 'ड्रामा क्वीन'च्या एन्ट्रीमुळे बिग बॉस मराठीच्या घरात फूल धमाल सुरू आहे. तिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे अनेक जण शॉक झाले होते. पण राखी सावंतच्या एन्ट्रीशिवाय बिग बॉसचा कोणताही सिझन अपूर्ण आहे. राखीचे एपिसोड प्रेक्षक आवर्जून पाहतात. ती सध्या घरातील सदस्यांची एकमेकांशी भांडणं लावून देताना दिसत आहे. पण सध्या एका कारणामुळे बिग बॉसच्या घरात प्रचंड राडा झाला आहे. राखीचा राग अनावर झाला आहे. संताप होत तिनं बिग बॉसच्या घरात अक्षरश: तोडफोड केली आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये राखी घराची तोडफोड करताना दिसत आहे.
बिग बॉस मराठी सिझन 6 चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये राखी घरात संतापलेली दिसत आहे. ती घरातील वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे. राखी आणि सागरमध्ये टोकाचे वाद होतात. घरातील साफसफाईवरून हा वाद झाला असल्याचं दिसून येत आहे. दोघांमधील वादामुळे घरात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण तयार होते.
बिग बॉसच्या घरातील बाथरूममध्ये प्रचंड घाण झालेली असते. राखी बाथरूममधील घाण सागरला दाखवते. तसेच राखीला स्वच्छ करण्यास सांगते. सागर बाथरूम साफ करण्यास थेट नकार देतो. याच कारणामुळे दोघांचा आवाज वाढतो. राखी सागरला, 'ही घाण बघा' म्हणत बाथरूममध्ये झालेला पसारा दाखवतो. त्यानंतर सागर, 'तू मला सांगू नकोस, मी वॉचमॅन नाहीये', असं सांगतो. यानंतर राखी संतापते आणि म्हणते, 'हे साफ तुम्हाला करावाच लागेल. आम्ही स्वयंपाक करतो ना....ते तु्म्ही सर्वे खाता ना.. मग नाटकं कशाला करायची' असं सागरला म्हणते. यानंतर सागर बाथरूममधून बाहेर येतो. तसेच राखीही तावातावाने बाथरूमबाहेर येते. तसेच किचनमध्ये जाते आणि काचेची वस्तू फोडते.
राखीचा असा अवतार पाहून तिला घरातील इतर सदस्य ओरडतात. बिग बॉसच्या घरातील वस्तू फोडणं नियमभंग आहे, राखीनं हा नियम मोडला आहे. आता राखीला शिक्षा मिळणार का? या एपिसोडमध्ये नवा कोणता ड्रामा पाहायला मिळणार? हे लवकरच कळेल.
