Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र, त्यांच्या स्थितीत चढ-उतार कायम आहेत. नुकतेच त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, पुन्हा ताप आल्याने राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांच्या हात-पायांमध्ये हालचालही दिसून आली होती. ते उपचारांनाही प्रतिसाद देत होते, त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
100 डिग्रीच्या वर ताप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 100 डिग्री ताप आल्याने राजू यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव स्वतः 80-90 टक्क्यांपर्यंत नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत. चाहते, कुटुंबीय आणि त्यांचे मित्र त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. जॉनी लिव्हर, सुनील पाल आणि अनेक विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी रुग्णालयात देखील गेले होते.
सोशल मीडियावर दिली हेल्थ अपडेट
राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती देत आहेत. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिले होते- 'प्रिय हितचिंतक माझे वडील राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते हळूहळू बरे होत आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. एम्स दिल्ली येथील डॉक्टर आणि त्यांची टीम राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक होण्यासाठी मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांचे आभार मानतो. मी सर्वांना विनंती करते की तुमचे प्रेम आणि प्रार्थना सुरु ठेवा.'
जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते.
महत्वाच्या बातम्या :