Rajpal Yadav First Post After Getting Bail: चेक बाउन्स प्रकरणी (Cheque Bounce Case) अडचणीत सापडलेल्या सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) राजपाल यादवला (Rajpal Yadav) कोर्टानं जामीन मंजूर केला. 17 फेब्रुवारी रोजी अभिनेत्याची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्यानं सोशल मीडियावर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राजपाल यादवनं त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
राजपाल यादवची सोशल मीडिया पोस्ट
अंतरिम जामिनावर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजपाल यादव पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झालाय. राजपाल यादवनं अलीकडेच इंस्टाग्रामवर त्याची पहिली पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, "तुमच्या सर्व प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद..." दरम्यान, राजपाल यादवनं केलेली ही पोस्ट खूपच साध्या आणि भावनिक स्वरात लिहिलेली आहे, यासोबतच राजपाल यादवनं एक हात जोडलेला इमोजीही पोस्ट केला आहे.
राजपाल यादवच्या पोस्टवर चाहत्यांची हृदयस्पर्शी कमेंट्स
तुरुंगातून जामीनावर बाहेर आलेल्या राजपाल यादवनं आपल्या पहिल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. किंवा कोणतंही रडगाणं गायलेलं नाही. याउलट अभिनेत्यानं मनापासून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहत्यांनीही राजपाल यादवच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं लिहिलंय की, "तू आमच्या पिढीचा हिरा आहेस..." तसेच, अनेक चाहत्यांनी त्याच्या परतण्याबाबत आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात.
राजपाल यादव आता पुढे काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष
चेक बाउन्स प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राजपाल यादवची काही दिवसांपूर्वी तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली. बऱ्याच दिवसांपासून राजपाल यादव तुरुंगात होता.पण, सध्या त्याला तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. राजपाल यादव हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा, आपल्या कॉमेडीनं सर्वांची मनं जिंकणारा राजपाल यादव नेहमीच चाहत्यांच्या गळ्यातील ताईत राहिला आहे. तुरुंगातून बाहेर येताच, राजपाल यादवनं सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव कोणतं पाऊल उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
