Rajpal Yadav cheque bounce case latest update: अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. 9 लाख रूपयांचं कर्ज फेडू न शकल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.  तुरुंगात आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला बॉलिवूडकडून मदतीचा हात देण्यात आला.  इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याला आर्थिक मदत केली.  दरम्यान, राजपाल यादव संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांनी राजपाल यादवला खंबीर राहून आव्हानांचा सामना करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, प्रेमानंद महाराजांना आधीच राजपाल यादववर आर्थिक संकट ओढावणार असल्याची कुणकुण लागली होती का?  असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.   या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी राजपाल यादव  प्रेमानंद महाराज यांची भेट घेण्यासाठी वृंदावनला गेला होता.  या भेटीत राजपालने त्यांच्यासमोर कॉमेडी सादर केली. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.  हास्यविनोद झाल्यानंतर प्रेमानंद महाराज म्हणाले, "आपल्या आयुष्यात दु:ख आणि संकटे येत असतात. त्यामुळे आपलं चित्त देवाशी जोडून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.  दु:ख जवळ आल्यानंतर आपण जवळच्या लोकांपासून दूर जातो.  आयुष्य कठीण वाटू लागतं.  संकटकाळत आपल्याला देव सावरतो. आयुष्यात  दु:ख व्यतिरिक्त आर्थिक समस्या देखील आहे. जेव्हा तू संकटात सापडशील, तेव्हा देव तुझ्या बाजूने असेल.  देवाच्या नावाचा जप कर, हार अजिबात मानू नकोस",  असा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी राजपालला दिला होता.

 

प्रेमानंद महाराज सल्ला देत असताना राजपाल यादव खूप भावुक होतो.  यानंतर तो प्रेमानंद महाराजांना, पुढच्या वेळेस आल्यानंतर पत्नीला घेऊन येईन, असं सांगतो.  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'प्रेमानंद महाराजांना राजपालवर आधीच संकट ओढवणार असल्याची माहिती मिळाली होती का? या संकटाची कुणकुण त्यांना आधीच लागली होती का?', असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झाली? रितेश देशमुखने सांगितला 'तो' खास प्रसंग, नेमकं काय घडलं?