Rajpal Yadav first reaction after jail release: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव  गेल्या 11 दिवसांपासून चेक बाउन्स प्रकरणात तुरुंगात होता.   17 फेब्रुवारी रोजी त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.  त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.  सुटकेनंतर त्यानं  प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.  सुटकेनंतरची ही त्याची पहिली प्रतिक्रिया आहे. त्यानं एबीपी माझाशी बोलताना,  तुरुंगात नेमके कसे दिवस घालवले, तुंरुगातील दिवस कसे गेलेत? याबद्दल त्यानं माहिती दिली. तसेच यावेळी त्यानं पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. 

तुरुंगातून सुटल्यानंतर राजपाल यादवनं   एबीपी न्यूजचे प्रतिनिधी सुशील कुमार पांडे यांच्याशी संवाद साधला. राजपाल यादवने यावेळेस सर्वांचे आभार मानले. देशातील जनतेचे  आणि त्याच्यासोबत उभे राहिलेल्या सर्वांचे त्यानं आभार मानले. या संभाषणादरम्यान, राजपाल यादवनं तुरुंगातील त्याच्या दैनंदिन दिनचर्याबद्दल सांगितले, तो आपल्या दिवसाची सुरुवात प्राणायामपासून करत होता. तो तुरुंगात असताना इतर कैद्यांशीही संवाद साधात होता. दिवसभरात तो बऱ्याच गोष्टी करत होता.

यावेळी त्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गु्प्ता यांनाही आवाहन केले. तुरुंगात असताना त्याच्या आसपास अनेक असे कैदी होते, ज्यांची शिक्षा जवळजवळ पूर्ण झाली होती. त्यामुळे दिल्ली सरकारने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करावा.   तसेच कायद्यानुसार,  योग्य चौकशी करावी आणि अशा कैद्यांसाठी  काही सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यानं विनंती केली. त्याच्या मते, असा निर्णय घेतल्यास संबंधित कैद्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.   तसेच समाजात पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करू शकतील.

राजपाल यादव हा बराच काळ तुरुंगात होता.  त्यानं 5 फेब्रुवारी 2026 रोजी आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून तो तुरुंगात आहेत, सुरुवातीला त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो  अर्ज फेटाळला.  त्यानंतर त्याच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जामिनीसाठी न्यायालयात अर्ज केला. सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने राजपालला अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर तो तुरुंगाच्या बाहेर आला.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलीम खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल का करण्यात आलं? त्यांची आता प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वडिलांचं छत्र हरपलं, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शुभम जाधवची हळवी पोस्ट