मुंबई : काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते (rajinikanth) रजनीकांत यांनी त्यांच्या प्रकृतीचं कारण देत येत्या काळात सक्रिय राजकारणाच्या वर्तुळात न उतरण्याची बाब जाहीर केली होती. पण, तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात यावं, असाच आग्रह त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून धरणअयात आला. किंबहुना काही चाहते आणि समर्थकांनी तर, यासाठी चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे हीच मागणी उचलून धरत एक आंदोलनही केलं. ज्यानंतर अखेर संपूर्ण परिस्थिती पाहून खुद्द रजनीकांत यांनीच काहीशी नाराजी व्यक्त करत चाहत्यांना एक आवाहन केलं आहे.


चूक झाली! नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटरवर अभिनेत्रीचे बोल्ड फोटो


ट्विटरच्या माध्यमातून एका पत्रकाद्वारे त्यांनी ही बाब सर्वांच्याच निदर्शनास आणून देत वस्तुस्थिती सर्वांपुढं ठेवली. शिवाय आपण राजकारणात नेमके का येत नाही आहोत, याची कारणं अधिकच सुस्पष्ट स्वरुपात मांडली.


'माझ्या नेतेपदासाठी आंदोलनात सहभागी न झालेल्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी यापूर्वीच राजकारणात प्रवेश का, करत नाही याबाबतची कारणं स्पष्ट केली आहे. मी माझा निर्णय़ही सांगितला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंतीच करतो की, माझ्या राजकीय प्रवेशाचीच मागणी करण्यासाठी अशा प्रकारची आयोजनं करु नका आणि मला आणखी वेदना देऊ नका', असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं.


‘va Thalaiva va’ असं म्हणत रजनीकांत यांनी राजकारणात यावं, अशी मागणी करणाऱ्या हजारो समर्थकांचं आंदोलन पाहून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी रजनीकांत यांना नाईलाजानं हे ट्विट करावं लागलं.





तीन वर्षांनंतर राजकीय प्रवेशाचा निर्य़ण बदलला....


29 डिसेंबरला सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय प्रवेशाच्या सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला. राजकीय प्रवेशाची घोषणा केल्यानंतर जवळपास 3 वर्षांनंतर ही घडी समीप आलेली असतानाच या लोकप्रिय अभिनेत्यानं चाहत्यांना धक्का दिला. तामिळनाडूतील आगामी निवडणुकांमध्ये यंदा नव्या घडामोडी घडणार असं चित्र असतानाच रजनीकांत यांच्या या घोषणेमुळं अनेकांचाच हिरमोड झाला. असं असलं तरीही अभिनेत्याची बाजू ऐकत आता चाहते त्यांचा मान ठेवतील हिच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.