Rajeshwari Kharat : सिनेक्षेत्रात काम करत असताना अनेक अभिनेत्रींना वाईट अनुभव आलेले पाहायला मिळतात. आजवर दिग्दर्शकांनी वाईट मागण्या केल्याचे खुलासे अनेकदा अभिनेत्रींनी केले आहेत. दरम्यान, फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातला (Rajeshwari Kharat) सुद्धा अशा वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 

'मी म्हणाले आता मी नाही येऊ शकतं, मला वेळ लागणार'

राजेश्वरी खरात म्हणाली, मला इंडस्ट्रीत असे वाईट अनुभव येतील, याची कल्पना गार्गी ताईंनी दिली होती. लोक कुठंपर्यंत जाऊ शकतात आणि त्यांना समोरे जाण्यासाठी तू अगोदर स्ट्राँग पाहिजेस. मी त्यांचं नाव घेणार नाही. मी रिहर्सलसाठी आले होते. एक स्क्रिप्ट होती, त्याची रिहर्सल चालू होती. त्यावेळी  दिग्दर्शकांचा मला कॉल आला होता. ते मला म्हणाले की, आता तू कुठे आहेस? मी म्हणाले, प्रोजेक्टच्या रिहर्सलसाठी आले आहे. मग ते म्हणाले की, तुला किती वेळ आहे? मी म्हटलं मला वेळ लागेल. ते म्हणत होते की, माझ्या स्टुडिओला ये.. मी म्हणाले आता मी नाही येऊ शकतं. मला वेळ लागणार आहे. 

दिग्दर्शक म्हणाले, तुला सांगितलं की, तू लगेच इथं आली पाहिजेस

त्यानंतर मी त्यांना विचारलं की, काय झालं? काय काम आहे? मग ते दिग्दर्शक म्हणाले, तू मला विचारायचं नाही. काय काम आहे? मी तुला सांगितलं की, तू लगेच इथं आली पाहिजेस.. मी खरोखर दुसऱ्या दिग्दर्शक सरांसमोर रडायला लागले होते. त्यांनी विचारलं काय झालं? ते म्हणाले, अशा गोष्ट होत राहातात. दुसरा विषय कॉम्प्रोमाईजचा देखील आहे. लोक विचारायला घाबरत नाहीत. चुकीचं आहे. मला विचारलं मी सरळ सांगितलं मी असं काही करत नाही. 

पुढे बोलताना राजेश्वरी खरात म्हणाली, मी मालिकांमध्ये काम करण्यासही प्रयत्न केले आहेत. मात्र, तिथे सिलेक्ट होऊन मी रिप्लेस झालेली आहे. माझ्यामागे कोणतं बॅनर किंवा नाव नसल्याने तसं झालंय. कित्येकदा रिप्लेस झालेली आहे. त्याचं मला दु:ख नाहीये. मी यातून शिकते आहे. (Rajeshwari Kharat questions trollers)

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?

'हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला', महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं गाणं कोणाचं आहे?