Raja Shivaji Vidya Balan:महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर ' राजा शिवाजी ' चित्रपट प्रदर्शित झाला. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनेता हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. शंभर कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या मराठीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून या सिनेमाचा बोलबाला आहे. शिवाय दिग्गज बॉलीवूड कलाकारांचे स्टारकास्ट या चित्रपटात असल्याने त्यांच्या भूमिकांविषयीही प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे.  अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन यासारखे अनेक बॉलीवूड कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.  यातील बडी बेगमची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या चर्चेत आहे. खरंतर या चित्रपटासाठी विद्या ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. बॉलीवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीला या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. पण तिने नकार दिल्यामुळे विद्या बालनची या भूमिकेसाठी वर्णी लागली. 

Continues below advertisement

विद्या बालनला विचारण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्रीला विचारलेलं ...

'राजा शिवाजी' या चित्रपटात विद्या बालन बड़ी बेगमची भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटासाठी सुरुवातीला तब्बूचे नाव पुढे आले होते. फ्री प्रेस जर्नल च्या एका वृत्तानुसार विद्या बालनच्या आधी बॉलीवूड अभिनेत्री तब्बूला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने यालाही दुजोराही दिला आहे. मात्र तारखांच्या समस्येमुळे तब्बू ने ही भूमिका नाकारली. त्यानंतर रितेशने विद्या बालनला संपर्क साधला. आणि विद्याने एका क्षणात ही भूमिका करण्याची तयारी दर्शवली.

विद्या बालनने जिंकली प्रेक्षकांची मने

राजा शिवाजी चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाचा सर्वत्र कौतुक होत आहे.प्रेक्षकांना तिची बडी बेगम उर्फ ताझुल मुखिदरत बडी साहिबा ही भूमिका प्रचंड आवडत आहे. बडी बेगम या विजापूर सल्तनतमधील एक मोठी असामी होती. ज्या मराठा शासक शिवाजी राजांना विरोध करणारी बडी बेगम ची भूमिका साकारणं हे अतिशय कठीण होतं. पण विद्या बालनने ही जबाबदारी लीलया पेलली आहे .

Continues below advertisement

तब्बूने राजा शिवाजीसह भुलभुलय्या 3 मधूनही घेतली माघार

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राजा शिवाजी चित्रपटाच्या आधी तब्बू ने कार्तिकार्यांचा हॉरर कॉमेडी चित्रपटातून म्हणजेच भुलभुलैया 3 या चित्रपटातूनही काढता पाय घेतला होता. यापूर्वीच्या भागात तब्बू ने अंजली का आणि मंजुलिका या जुळ्या बहिणींची दुहेरी भूमिका साकारली होती.तिच्या भूमिकेला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती.