Budh Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Budh Gochar)ग्रहाचं संक्रमण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच बुधाचं नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचं आहे. द्रिक पंचांगानुसार बुध ग्रह 7 मे रोजी म्हणजेच उद्या भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्राची बुध ग्रहाबरोबर मैत्री फार अतूट मानली जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचं भरणी नक्षत्रात होणारा प्रवेश काही राशींसाठी करिअरच्या दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. तसेच, काही राशींच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. बुधाचं भरणी नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

बुध ग्रहाचा भरणी नक्षत्रात होणारा प्रवेश मिथुन राशीसाठी लाभदायी ठरेल. या काळात करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तसेच, तुमचं संवादकौशल्य दिसून येईल. बिझनेसमध्ये काही नवीन डील्स तुमच्या फायनल होऊ शकतात. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

बुधाचं नक्षत्र परिवर्तन कन्या राशीसाठी शुभकारक असेल. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. या काळात पैशांची केलेली गुंतवणूक देखील लाभदायी ठरणार आहे. तुम्हाला चांगले पैसे मिळतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ स्थिरतेचा आणि सुरक्षेचा असणार आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तुमच्या बिझनेसचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. नवीन कॉन्ट्रॅक्ट तुमच्या हाती लागू शकते. तुमची रखडलेली कामे तुम्हाला या कालावधीत पूर्ण करता येतील. 

बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाच्या काळात 'या' राशींना सावधानतेचा इशारा 

बुधाचा भरणी नक्षत्रात होणारा प्रवेश मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या अनावश्यक खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                     

Shukra Gochar 2026 : राहूच्या नक्षत्रात होणार शुक्र ग्रहाचा प्रवेश; ऐन मे महिन्यात सिंहसह 4 राशींचं नशीब खुलणार, मालामाल होतील राशी