Raja Shivaji: 'राजा शिवाजी' या चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. छत्रपती शिवरायांवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय. मराठीतील सर्वाधिक बजेट असणारं हा चित्रपट आहे. 100 कोटींच्या हा चित्रपट येत्या 1 में रोजी सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाचं शुटींग झालं आहे.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा कुठे कुठे शूट करण्यात आलाय माहितीय? (Raja Shivaji)

Continues below advertisement

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित हा चित्रपट 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका स्वतः रितेश देशमुख साकारत असून याशिवाय या चित्रपटाचं लेखन आणि निर्मितीमध्ये सुद्धा त्याचा सहभाग आहे.या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचं काम गेल्या 10 वर्षांपासून सुरु आहे. 3 - 4  वर्षांपासून शुटींग सुरु आहे. 

कुठे कुठे शुटींग करण्यात आलं?

महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरसह सातारा जिल्हयातील अनेक ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. राजा शिवाजी चित्रपटाच्या काही भागाचं शुटींग साताऱ्यातील महुली संगमयेथे करण्यात आलं आहे. शिवाय साताऱ्यातील वाईमध्ये  काही निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणी या सिनेमातील  काही सीन शूट करण्यात आले आहेत. मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत तसेच फिल्मसिटी परिसरातील तलावाच्या ठिकाणी काही सीन शूट करण्यात आले आहेत. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले हे सह्याद्री पर्वत रांगेत काही ठिकाणी राजा शिवाजी या भव्य चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे.   

Continues below advertisement

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा नव्या पिढीसमोर भव्यतेने आणि भावनिकतेने उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेअनुभव ठरणार आहे. प्रत्येक फ्रेममध्ये इतिहासाची भव्यता आणि वास्तवतेची झलक पाहायला मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव मिळणार आहे.