Jacqueline Fernandez: तब्बल 200 कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाईल मनी लाँड्रिंग प्रकरणात एक नवीन कायदेशीर वळण आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात माफीची साक्षीदार बनण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचा समावेश आहे, ज्याच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखरची गर्लफ्रेंड आहे. सुकेशने तिला आतापर्यंत कोट्यवधींच्या वस्तू भेट केल्या आहेत.
जॅकलिनच्या अर्जावर ईडीचा आक्षेप
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, याचिका अस्पष्ट आणि अपूर्ण असून, उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. न्यायालयाने ईडीची विनंती मान्य केली आणि उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला. जॅकलिनने न्यायालयाला सांगितले की, तिची तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आणि सत्य उघडकीस आणण्यास मदत करण्याची इच्छा आहे. माफीच्या साक्षीदाराचा दर्जा दिल्यास, ती तपासात आरोपींपासून वेगळी होऊन साक्षीदार बनू शकेल. ही प्रक्रिया न्यायालयाची मंजुरी आणि ईडीच्या संमतीवर अवलंबून आहे.
या प्रकरणात अंदाजे 200 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा समावेश आहे. सुकेश चंद्रशेखरवर उच्चभ्रू व्यक्तींना लक्ष्य करून बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेचा दावा आहे की, या प्रकरणात मोठे व्यवहार आणि महागड्या भेटवस्तूंचा वापर करण्यात आला. जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात बऱ्याच काळापासून चौकशीला सामोरे जात आहे. तिने यापूर्वी दावा केला आहे की, तिला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहिती नव्हती आणि खोट्या माहितीच्या आधारे तिला यात गोवण्यात आले. आता, ईडीचे न्यायालयातील उत्तर आणि पुढील सुनावणी या प्रकरणाची दिशा ठरवेल.
सुकेश म्हणाला, प्रेमात आणि युद्ध सर्वकाही माफ
दरम्यान, जॅकलिनने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करताच सुकेशने जेलमधून चिट्टी लिहिली आहे. त्या चिट्टीत त्याने All is fair in Love and War असं म्हटलं आहे. तू जो निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबा असेल असेही म्हटलं आहे.
सुकेशने जॅकलिनला काय काय दिलं?
- सुकेशने जॅकलिनला प्राणीप्रेमी म्हणून अनेक महागडे प्राणी भेट दिले होते
- पर्शियन मांजरी: सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या एकूण चार पर्शियन मांजरी.
- अरबी घोडा: 'एस्पुएला' नावाचा एक अरबी घोडा, ज्याची किंमत 52 लाख रुपये होती.
- 15 जोड झुमके (Earrings), महागडे हिऱ्यांचे हार आणि ब्रेसलेट्स.
- गुच्ची (Gucci) आणि चॅनेल (Chanel) यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या अनेक महागड्या हँडबॅग्स, जिमी चू (Jimmy Choo) चे शूज आणि लुई विटॉनचे कपडे.
- घड्याळे: कोट्यवधी रुपयांची रोलेक्स (Rolex) सारखी महागडी घड्याळे.
- जॅकलिनला सुकेशने एक 'मिनी कूपर' (Mini Cooper) कार भेट दिली होती (जी नंतर तिने परत केल्याचे सांगितले जाते).
- डिझायनर क्रॉकरी: युवरोज कंपनीची महागडी क्रॉकरी सेट.
अलीकडील दावे (तुरुंगातून केलेली घोषणा)
- तुरुंगात असतानाही सुकेशने पत्रांद्वारे जॅकलिनला अनेक अजब भेटवस्तू देण्याचे दावे केले आहेत.
- प्रायव्हेट जेट: व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिनच्या नावाचे आद्याक्षरे (JF) असलेले खास 'गल्फस्ट्रीम जेट'.
- आलिशान बंगला: बेव्हरली हिल्स (अमेरिका) येथे 'द लव्ह नेस्ट' नावाचा बंगला दिल्याचा दावा.
- बाली बेटाचा भाग: तिच्या आईच्या आठवणीत बाली बेटाचा एक भाग तिला दिल्याचे सुकेशने पत्रात म्हटले होते.
- 'लेडी जॅकलिन' नावाची एक आलिशान यॉट (Yacht).
इतर महत्वाच्या बातम्या
