Raja Shivaji Box Office Collection: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शौर्य गाथेवर आधारीत 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाची 28 व्या दिवशीही घौडदौड सुरु आहे. 'राजा शिवाजी' या सिनेमाच्या (Box Office) सिंहगर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं आहे. या सिनेमाला लवकरच एक महिना पूर्ण होईल. दरम्यान, या काळात सिनेमाच्या कमाईत  कोणतीही घट दिसून आलेली नाही. 'राजा शिवाजी' या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या 28 दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन (Box Office Collection) तुम्ही  याचा नक्कीच अंदाज लावू शकता. दरम्यान, गुरुवारी म्हणजेच 28 व्या दिवशी या सिनेमानं किती रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

'राजा शिवाजी' सिनेमाची शानदार बॉक्स ऑफिस कमाई (Raja Shivaji movie box office collection day 28)

मराठी सिनेसृष्टीत 'राजा शिवाजी' हा सिनेमा सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक बनला आहे.  1 मे 2026 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला होता.  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर आधारीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या ऐतिहासिक सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करुन दाखवली.

या मराठी सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.  देशांतर्गत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.  सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, 'राजा शिवाजी' या सिनेमाच्या  ताज्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, रितेश देशमुखच्या ऐतिहासिक 'राजा शिवाजी' या सिनेमानं 28 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या 28 व्या दिवशी या सिनेमानं  40 लाखहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.   

Continues below advertisement

 

चौथ्या बुधवारच्या तुलनेत गुरुवारी या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये किंचित  वाढ झाली आहे. 100 कोटींचा आकडा या सिनेमानं पार केला आहे.  माहितीनुसार, 'राजा शिवाजी' हा सिनेमा 'सैराट'नंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. रितेश देशमुख व्यतिरिक्त या सिनेमात जिनिलिया देशमुख, संजय दत्त,  भाग्यश्री, अभिषेक बच्चन, विशेष म्हणजे सलमान खान यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज या सिनेमात पाहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

भारताच्या प्रसिद्ध शेफला स्तनाचा कर्करोग, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, चाहत्यांना केलं आवाहन

ABP माझाच्या बातम्या LIVE..