Raja Shivaji on OTT: सध्या थिएटरमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपट प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक शौर्यगाथा असलेल्या या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवरही दमदार यश मिळवलं आहे. 100 कोटींच्या जवळ पोहोचलेल्या राजा शिवाजी चित्रपटाच्या OTT रिलीजबाबत सध्या चर्चांना उधाण आलंय. अशातच ‘राजा शिवाजी’ ऑनलाइन नेमका कधी आणि कुठे पाहायला मिळणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (Raja Shivaji OTT Release)
OTT वर कधी आणि कुठे रिलीज होणार?
मराठी सिनेसृष्टीतील भव्य चित्रपटांपैकी एक म्हणून ‘राजा शिवाजी’चं कौतुक केलं जात आहे. या पीरियड ड्रामाच्या OTT रिलीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साधारणपणे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटांना OTT वर येण्यासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ‘राजा शिवाजी’बाबतही असंच चित्र पाहायला मिळू शकतं. आजकाल अनेक चित्रपट निर्माते पोस्टर किंवा प्री-क्रेडिट सीनमधून डिजिटल पार्टनरची माहिती जाहीर करतात. मात्र, ‘राजा शिवाजी’च्या बाबतीत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, हा चित्रपट थिएटरवर राज्य केल्यानंतर आता थेट JioHotstar वर स्ट्रीम केला जाण्याची शक्यता आहे.
मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही आणि रिलीज डेटही निश्चित करण्यात आलेली नाही. थिएटरमध्ये ‘राजा शिवाजी’ मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला आहे. मात्र OTT वर रिलीज होताना हा चित्रपट पॅन इंडिया पातळीवर सादर केला जाईल, अशी चर्चा आहे. त्यानुसार चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
OTT डीलसाठी कोट्यवधींचा व्यवहार?
काही माध्यम वृत्तानुसार ‘राजा शिवाजी’च्या डिजिटल राइट्सची डील चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती. या चित्रपटाचे OTT हक्क 90 कोटी रुपयांहून अधिक रकमेत विकले गेल्याची चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांपासून अभिनेता रितेश देशमुख यांनी या चित्रपटावर काम केलं आहे.महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच एक मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. अवघ्या 13 दिवसात या चित्रपटाने 92.81 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपट 100 कोटींचा कलेक्शन करणार का ? याकडे अजूनही प्रेक्षकांचे लक्ष आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेसोबतच दिग्दर्शकाची जबाबदारीही सांभाळली आहे.
