Raja Shivaji Box Office Collection: महाराष्ट्राच्या रणभूमीवर जसा भगवा दिमाखात फडकतो, तसाच ‘राजा शिवाजी’चा (Raja SHivaji) जयघोष सध्या बॉक्स ऑफिसवर घुमताना दिसतोय. रितेश देशमुख दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटांनं दुसऱ्या आठवड्यातही आपली समशेर तितक्याच ताकदीनं फिरवत बॉक्स ऑफिसवर तब्बल 75.10 कोटींचा गड सर केला आहे. थिएटरबाहेर उसळणाऱ्या गर्दीपासून ते प्रत्येक शोला होणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटापर्यंत, ‘राजा शिवाजी’चा दरारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 

Continues below advertisement

विकेंडला मुसंडी मारत विक्रमी कमाई

पहिल्या आठवड्यातच 57.70 कोटींची कमाई करत चित्रपटानं दमदार आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा उत्साह किंचितही कमी झालेला दिसला नाही. शुक्रवारी 3.50 कोटींची कमाई केल्यानंतर शनिवारी चित्रपटानं जोरदार मुसंडी मारत 6.30 कोटींचा आकडा गाठला. रविवारी तर थिएटरमध्ये अक्षरशः जल्लोष पाहायला मिळाला आणि चित्रपटानं 7.60 कोटींची कमाई करत 75 कोटींचा भव्य टप्पा पार केला.

महाराष्ट्राबाहेरही ‘राजा शिवाजी’चा दबदबा

फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होत असून अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल जात आहेत.

Continues below advertisement

पहिला आठवडा एकूण: ₹५७.७० कोटीआठवा दिवस (शुक्रवार): ₹३.५० कोटीनववा दिवस (शनिवार): ₹६.३० कोटीदहावा दिवस (रविवार): ₹७.६० कोटी

‘राजा शिवाजी’चं तोडले मराठी सिनेसृष्टीचे हे रेकॉर्ड

‘राजा शिवाजी’नं आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1.मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डे2.मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग वीकेंड3.मराठी चित्रपटासाठी एका दिवसातील सर्वाधिक कमाई4.मराठी चित्रपटासाठी पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई

इतिहास, भावनिक कथानक, भव्य दृश्यं आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर ‘राजा शिवाजी’नं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तरी या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत.

मराठी चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

सध्या ‘राजा शिवाजी’ हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बाई पण भारी देवा या चित्रपटाने 76.28 कोटींची कमाई केली होती. ‘राजा शिवाजी’ने धडाक्यात हा विक्रम मोडला आहे.  

1. सैराट – 90 कोटी2. बाई पण भारी देवा – 76.28 कोटी3. राजा शिवाजी – 64.43 कोटी (9 दिवस)4. वेड – 61.2 कोटी5. नटसम्राट – 42 कोटी6. पावनखिंड – 37.72 कोटी7. लई भारी – 37 कोटी8. कट्यार काळजात घुसली – 35 कोटी9. ठाकरे – 31.6 कोटी10. टाइमपास – 30 कोटी