ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
1. आखाती देशांमधली युद्धाची परिस्थिती चिघळली तर भारताला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल, त्यामुळेच पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन, नेमकं कारण समोर https://tinyurl.com/bdtukxtf पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक, इंधन-खत पुरवठ्याचा आढावा https://tinyurl.com/2wu7rn9k
2. पेट्रोल, डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा, वर्षभर सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन, हे आवाहन म्हणजे मोदींच्या अपयशाचा पुरावा, देश चालवणे आता कॉम्प्रमाईज्ड पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही, विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका https://tinyurl.com/y9cv7n52 पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांची चहूबाजूंनी टीका, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर संकट आठवलं, अखिलेश यादवांचा टोला, तर काटकसरीची सुरुवात भाजप नेत्यांपासून करण्याच्या विरोधकांच्या सूचना https://www.youtube.com/watch?v=lsYE8ekGgfM
3. व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज https://tinyurl.com/5cmnpy8h मेट्रो फ्री करा, मंत्र्यांचे ताफे कमी करा, नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नागरिक संतापले https://tinyurl.com/mn53nv5t
4. सुनेत्रा पवारांची संपूर्ण भारतात वहिनी म्हणून ओळख निर्माण होईल, खासदार सुनील तटकरेंचं भाकित, तर आदिती तटकरे मुलगी म्हणून काम करते, सुनेत्रा पवारांकडून कौतुक https://tinyurl.com/bdexekf5
5. मला दिलगिरी व्यक्त करण्यासाठी विचारलं, मी नकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता कुणाल कामराला कायम पाठिंबा, सुषमा अंधारेंचा निर्धार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गीत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष https://www.youtube.com/watch?v=HZ6QGQMRiGc
6. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी मुख्य संशयित निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://tinyurl.com/32vs5fn2 निदा खानला आश्रय देणं छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांना भोवणार, नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची महापौरांची माहिती, तर मतीन यांनी अनधिकृत बांधकामं केल्याचंही उघड https://tinyurl.com/5bbtud7d 7. डहाणू तालुक्यातील विवळवेढे इथे कातकरी पाड्यावरील भीषण वास्तव माझावर, प्रशासन खडबडून जागं, बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना, ग्रामस्थांनी मानले एबीपी माझाचे आभार https://www.youtube.com/watch?v=NjTeY57YD7o राज्यात उन्हाचा चटका वाढला, विहिरी, बोअरवेल पडले कोरडे, परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणीटंचाई, टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु https://tinyurl.com/yc6jxfze
8. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीविरोधात कट, विजेचा शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न फसला; पत्नीसह प्रियकराला अटक, यवतमाळच्या वडगावमध्ये खळबळ https://tinyurl.com/3ne5ast8 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, राजगड तालुक्यात अतिक्रमणाचा व्हिडीओ काढताना तरुणाला झाली होती मारहाण, मारहाणीविरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी तरुण आक्रमक https://tinyurl.com/4443n8kt
9. 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, सरकारी साक्षीदार बनण्याच्या जॅकलिनच्या अर्जाला ईडीचा विरोध, तिच्याविरोधात पुरावे असल्याचा ईडीचा कोर्टात दावा https://www.youtube.com/watch?v=nL7o8DqxXzU
10. मुंबई इंडियन्स IPL मधून बाहेर, अखेरच्या चेंड़ूवर बंगळुरूचा मुंबईवर दोन गडी राखून विजय https://tinyurl.com/43mtswma आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, प्ले ऑफच्या शर्यतील टिकण्यासाठी पंजाबला विजय आवश्यक https://tinyurl.com/34zsp24p
एबीपी माझा स्पेशल
एक वर्ष सोन्याची खरेदी का नको? काय आहे पंतप्रधान मोदी यांचे 72 अब्ज डॉलरच्या फॉरेक्समागचे लॉजिक? https://tinyurl.com/mrymmwtb
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत https://tinyurl.com/44fj249e
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w