Raja Shivaji Box Office Collection: जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश विलासराव देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने (Raja Shivaji) आपली ऐतिहासिक यशस्वी घोडदौड सुरू ठेवत, भारतात 100 कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात 101.40 कोटी रुपयांची उत्कृष्ट निव्वळ कमाई करून, या चित्रपटाने आपला ब्लॉकबस्टर दर्जा अधिकच मजबूत केला आहे. (Raja Shivaji Box Office Collection)

Continues below advertisement

मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे, सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आणि सर्वाधिक एका दिवसातील कलेक्शनसह विक्रमांची नोंद केल्यानंतर, या भव्य चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडमध्येही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.

बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत निव्वळ):

पहिला आठवडा: ₹५७.७० कोटीदुसरा आठवडा: ₹२७.०० कोटीतिसरा वीकेंड: ₹८.४० कोटी

Continues below advertisement

तिसरा आठवडा + चौथा वीकेंड:१८ वा दिवस (सोमवार): ₹१.२५ कोटी१९ वा दिवस (मंगळवार): ₹१.४५ कोटी२० वा दिवस (बुधवार): ₹१.२० कोटी२१ वा दिवस (गुरुवार): ₹०.९५ कोटी२२ वा दिवस (शुक्रवार): ₹०.७० कोटी२३ वा दिवस (शनिवार): ₹१.३५ कोटी२४ वा दिवस (रविवार):  ₹१.४० कोटी

फक्त भारतातील एकूण कमाई

मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण क्षण असलेला 'राजा शिवाजी' हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातीत वारशाला प्रचंड अभिमानाने आणि जगभरातील प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रेमासह सन्मानित केले आहे.

दिग्गज कलाकारांची फौज

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे दमदार संगीत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन या चित्रपटाला वेगळीच उंची प्रदान करत आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि ऐतिहासिक वास्तवतेची झलक जाणवते. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.