Ahilyanagar Blast: अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील पोलीस मुख्यालयाच्या (Police Headquarters) मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान (Training) एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर दुर्घटना घडली आहे. मॉक ड्रिल (Mock Drill) हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असताना, एका हँडग्रेनेडचा (Hand Grenade) हातातच भीषण स्फोट (Blast/Explosion) झाला. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी (Trainee Police Personnel) गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की, यात दोन कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar Blast: माहिती देत असतानाच झाला स्फोट

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात नेहमीप्रमाणे प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होते. सकाळी 10 वाजता पोलीस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड कसा हाताळावा, याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली जात होती. मात्र, ही माहिती दिली जात असतानाच अचानक एका हँडग्रेनेडचा हातातच स्फोट झाला.

Ahilyanagar Blast: चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी

या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. तर इतर दोन कर्मचारी या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत.

Ahilyanagar Blast: खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

घटनेनंतर संपूर्ण पोलीस मुख्यालयात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. या घटनेमुळे पोलीस वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ahilyanagar Blast: नेमका स्फोट कसा झाला? अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात झालेला स्फोट हा स्मोक हँडग्रेनेड फुटल्यामुळे झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या ग्रॅनाईडची पीन काढल्यानंतर संबंधित जवानांकडून लिव्हर सुटल्याने हा अपघाती स्फोट झाल्याची माहिती राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिली आहे.  

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mumbai-Agra Highway Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर डंपर, ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात; बचावकार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यासह 6 जण ठार, 26 जखमी

Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना