Raja Shivaji Box Office Collection day 8: छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास सांगणारा ' राजा शिवाजी' (Raja Shivaji) बॉक्स ऑफिसवर मोठ्या दिमाखात उभा आहे.(Box Office Collection) आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आठव्या दिवशी भारतभरातून 66.38 कोटी रुपयांची कमाई केलीये. दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट, अजय अतुलचे अंगावर शहारे आणणार संगीत अशा अनेक कारणांमुळे आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या रांगेत तिसऱ्या स्थानावर ' राजा शिवाजी ' पोहोचलाय . केवळ वीकेंडलाच नाही तर वीकडेजमध्ये हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. 

Continues below advertisement

'राजा शिवाजी 'ची आठवड्याभरात किती कोटींची घोडदौड?

छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित असणारा रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनीत राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेलाच 11.35 कोटी रुपयांची कमाई केली. 6,192 शो आणि 32.3% ऑक्यूपन्सीसह या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धडाकेबाज एन्ट्री मारली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने 3.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या शुक्रवारीही कमाई घटलेली असली तरी शनिवार, रविवारी हा चित्रपट अधिक कमाई करेल अशी आशा आहे. आठवड्याभरात राजा शिवाजी या चित्रपटाने भारतभरात सुमारे 66.38 कोटी रुपयांची कमाई केलीय. 55.58 कमाई असून येत्या वीकेंडचा या चित्रपटाला आणखी फायदा होणार असल्याची चर्चा आहे. गेल्या चार दिवसांपासून बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन कमी होताना दिसत असलं तरी एवढ्यात तरी 'राजा शिवाजी ' बॉक्स ऑफिसवरचा ताबा सोडणार नाही, यात शंकाच नाही.या चित्रपटाचे लाईफ टाईम कलेक्शन 100 कोटींवर पोहोचू शकतं.

Continues below advertisement

'राजा शिवाजी'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज

छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित असणारा राजा शिवाजी हा 'पिरियड ड्रामा ' आहे. त्यामुळे या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची पाहायला मिळतेय. बॉलीवूड सह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, महेश मांजरेकर, भाग्यश्री पटवर्धन, सचिन खेडेकर, जेनेलिया देशमुख, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांचा यात समावेश आहे.