Weekly Horoscope 11 To 17 May 2026: मे महिन्याची (May 2026) सुरूवात झाली आहे, 11 ते 17 मे 2026 हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा तसेच प्रगती देणारा ठरणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे ऊर्जा, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. यामुळे काही राशींना करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील, तर काहींना खर्च आणि नातेसंबंधात संयम ठेवावा लागेल. विशेषतः विविध राजयोगामुळे काही राशींना लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.. मे महिन्याचा चा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत लक्षात येईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे गुंतवणुकीत सावध रहा. कुटुंबात एखाद्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सकारात्मक राहील.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा करिअरमध्ये स्थैर्य मिळेल. जुन्या अडचणी हळूहळू कमी होतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कातून फायदा मिळू शकतो. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. नोकरीत बदल किंवा नवीन प्रोजेक्टची सुरुवात होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. प्रवासाचे योग संभवतात.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी या आठवड्यात करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या कामाचे कौतुक होईल. काहींना पदोन्नती किंवा नवीन ऑफर मिळू शकते. मात्र भावनिक निर्णय घेणे टाळा. प्रेमसंबंधात थोडा तणाव जाणवू शकतो.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आर्थिक लाभ आणि मान-सन्मान वाढण्याचे योग आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. आरोग्य चांगले राहील, पण अति कामामुळे थकवा येऊ शकतो.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी संयम ठेवणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढू शकते. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक स्थिती सुधारेल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो. भावनिक निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. काही लोक तुमच्या विरोधात बोलू शकतात, पण शांत राहिल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि कुटुंबासाठी हा आठवडा आनंददायी राहील. प्रवासाचे योग आहेत. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होईल, पण खर्चही वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन लागेल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातील वातावरण सुधारेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. काहींना मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतो. आरोग्य चांगले राहील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नवीन ओळखी आणि नेटवर्किंगमुळे फायदा होईल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मित्रांबरोबर मतभेद टाळा. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा संवेदनशील राहू शकतो. आर्थिक निर्णय शांतपणे घ्या. नोकरीत मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 

हेही वाचा

Shani Sade Sati: पुढच्या 12 वर्षांसाठी 'या' राशींनी सावधान! 2027, 2028, 2029 वर्षात 'शनि साडेसाती' सर्वात प्रभावी, आयुष्यात 'हे' मोठे बदल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)