Yek Number Marathi Movie : सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज असं चित्र पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, दिसत असून 'ठाकरे साहेब' असा हलकासा आवाजही कानावर येतोय. याचं कारण म्हणजे मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला 'येक नंबर' (Yek Number) या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 


झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या 10 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना मिळतील. दरम्यान सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमुळे हा हा बायोपिक आहे का, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. 


अजय-अतुलने केली गाणी संगीतबद्ध


टीझरमध्ये धैर्य घोलपसह सायली पाटीलची झलकही दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटाच्या तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला निर्मात्या आहेत. 'येक नंबर'ला अजय-अतुल यांसारखे कमाल संगीतकार लाभले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. 


'कथाच या चित्रपटाचा नायक'


या सिनेमाविषयी प्रतिक्रिया देताना तेजस्वी पंडितने म्हटलं की, '' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टिझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. 'येक नंबर'ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही.’’






दिग्दर्शकांनी काय म्हटलं? 


 चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी म्हटलं की, 'ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा मला वाटले, मला काही सांगायची आणि काही नवीन पद्धतीने गोष्ट मांडायची संधी आहे. प्रेक्षकांना ही माझी मांडणी कशी वाटेल, या बद्दल खूप उत्सुकता आहे.' 


ही बातमी वाचा : 


Raj Thackeray Movie :  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी 'यक नंबर' जनमत बदलणार? चित्रपटांचा राजकीय प्रभाव