Raid 2 Box Office Collection Day 22: अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'रेड 2' (Raid 2 Movie) चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस पूर्ण झालेत. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं गेल्या 21 दिवसांत उत्तम कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'मिशन इम्पॉसिबल 8' आणि 'फायनल डेस्टिनेशन 6' हे दोन बहुप्रतिक्षित हॉलिवूड सिनेमे रिलीज झालेत. पण, या दोन्ही हॉलिवूड सिनेमांसमोर 'रेड 2' (Raid 2) पुरुन उरला आहे. 

Continues below advertisement

'रेड 2'नं रिलीजच्या बावीसाव्या दिवशी धमाकेदार कमाई केली. आज चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. जाणून घेऊयात 'रेड 2'च्या आतापर्यंतच्या एकूण कमाईबाबत सविस्तर...  

'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, अजय देवगणच्या 'रेड 2'नं 19 व्या दिवशीच 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. 19 दिवसांत 153.67 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्यानंतर, चित्रपटानं 20 व्या दिवशी 2.25 कोटी रुपये आणि 21 व्या दिवशी 1.75 कोटी रुपये कमावले.

Continues below advertisement

22 व्या दिवशी म्हणजेच, आज सकाळी 10:20 वाजेपर्यंत चित्रपटानं 1.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे आणि एकूण 159.42 कोटी रुपये कमावले आहेत. 20 व्या दिवसापासून आजपर्यंतच्या कमाईशी संबंधित डेटा सॅक्निल्कनुसार आहे. 22 व्या दिवसाच्या कमाईचा डेटा अद्याप अंतिम नाही. यामध्ये बदल होऊ शकतात.

'रेड 2' जाट-स्काय फोर्सपेक्षा खूपच चांगल्या स्थितीत 

22 व्या दिवशी 'जाट'नं फक्त 22 लाख रुपये कमावले, तर स्काय फोर्सला फक्त 20 लाख रुपये कमाविण्यात यश आलं. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याची अवस्था सर्वात वाईट होती. त्यातून फक्त 10 लाख रुपये जमा झाले होते. या वर्षी प्रदर्शित झालेले हे सर्व चित्रपट सर्वाधिक चर्चेत होते, तरीही ते सर्व चित्रपट या बाबतीत 'रेड 2' पेक्षा मागे होते. 'रेड 2' दररोज कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. 

दरम्यान, 2018 मध्ये, अजय देवगण पहिल्यांदाच रेड चित्रपटात अमय पटनायकच्या भूमिकेत दिसला. मग त्यानं सौरभ शुक्लाच्या घरावर छापा टाकला. यावेळी, 'रेड 2'मध्ये अमय पटनायकनं रितेश देशमुखनं साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या घरावर छापा टाकून बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि अमित सियार यांच्यासह सौरभ शुक्ला यांचीही भूमिका आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचा पहिला भाग दिग्दर्शित केला होता आणि 'रेड 2'चं दिग्दर्शनही त्यांनीच केलेलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rashami Desai Casting Couch: 'ऑडिशनच्या निमित्तानं घरी बोलावलं आणि बेशुद्ध केलं...'; कास्टिंग काऊचच्या अतीप्रसंगाबाबत अभिनेत्री स्पष्टच बोलली