Singer Raghu Dixit Marry With Varijashree Venugopal: प्रेमाला वयाचं बंधन नसतं... असं म्हणतात तेच खरंय... संगीतविश्वात एक अशीच अनोखी प्रेम कहाणी लिहिली गेलीय. फोक फ्युजनचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा 50 वर्षांचा गायक आणि 34 वर्षांची ग्रॅमी नॉमिनेटेड गायिका दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. आपल्यापेक्षा तब्बल 16 वर्षांनी लहान असलेल्या गायिकेसोबत सुप्रसिद्ध गायक लग्नगाठ बांधणार आहे. याच महिन्यात दोघेही साताजन्माच्या बंधनात अडकणार आहे. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या संगीत मैफीलीसारखीच आहे. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर हळूहळू प्रेम फुललं आणि आता दोघेही लग्न करणार आहेत. 

Continues below advertisement

फोक फ्युजनचा बादशाह आणि द रघु दीक्षित प्रोजेक्टचा गायक-फ्रंटमॅन रघु दीक्षित (Raghu Dixit) वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा संसार थाटणार आहे. त्याची होणारी पत्नीही सुप्रसिद्ध गायिका असून ती 34 वर्षांची आहे. म्हणजे, रघु दीक्षितहून तब्बल 16 वर्षांनी लहान... रघु दीक्षित ग्रॅमी नॉमिनेटेड गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपाल (Varijashree Venugopal) आहे. 

बंगळुरू टाईम्सशी बोलताना, 50 वर्षीय रघु यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा देत म्हटलंय की, या महिन्याच्या अखेरीस एका कौटुंबिक कार्यक्रमात हे जोडपं लग्न करणार आहे. 

Continues below advertisement

फोक फ्युजनचा बादशाह रघु दीक्षित कोण? 

रघु दीक्षित हा केवळ एक गायक नाही, तर भारतीय इंडी म्युझिक विश्वातलं एक प्रसिद्ध नाव. त्याचा बँड, द रघु दीक्षित प्रोजेक्टनं देशभरात आणि परदेशात धुमाकूळ घातला आहे. त्यानं कन्नड चित्रपटसृष्टीला अनेक गाजलेली गाणी दिलीत. त्याची 'म्हैसूर से आयी' आणि 'हे भगवान' ही गाणी आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत. रघु दीक्षितनं 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं.

दुसरीकडे, वरिजाश्री वेणुगोपालनं तिच्या जादुई आवाजानं आणि बासरीवादनानं जगाला मोहित केलंय. कर्नाटक संगीत आणि जाझचे शानदार फ्युजनचं कर्नाटक स्कॅट सिंगिंगची (Carnatic Scat Singing) निर्मिती करण्याचं श्रेय तिला जातं. यावर्षी, तिला जेकब कॉलियरसोबतच्या 'अ रॉक समवेअर' या गाण्यासाठी ग्रॅमी नामांकन मिळालंय. रघूनं वरिजाश्रीचं इंस्टाग्रामवर अभिनंदन केलेलं आणि तिला मैत्रीणही म्हटलेलं. कदाचित त्यावेळी तिला अजिबात कल्पना नसेल की, हाच मित्र त्याचा जीवनसाथी बनेल.

आधी मैत्री अन् आता साताजन्माचे जीवनसाथी...

रघु दीक्षित आणि वरिजाश्री यांच्यात आधी निखळ मैत्री होती. दोघांसाठीही संगीत प्राणाहून प्रिय आहे... आणि नेमकं हेच त्यांच्या प्रेमासाठी पहिली पायरी ठरलं. रघुनं सांगितलं की, "मी विचार केलेला की, आता आयुष्यात एकटंच राहायचं... पण नंतर मला वरिजाश्री भेटली अन् सर्वकाही बदललं. हे नातं अगदी नॅच्युरली मैत्रीतून प्रेमात बदललं..." 

रघु दीक्षितनं सांगितलं की, त्या दोघांमधील नातं खूपच मजबूत आहे. मग ते संगीत असो वा, जीवनाकडे पाहण्याचा साधा दृष्टीकोन. वरिजाश्रीच्या पालकांनीही दोघांच्या नात्याला मान्यता दिली आहे. आता दोघेही नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. 

रघु दीक्षितवर लैंगिक छळाचे आरोप 

रघु दीक्षितवर गंभीर आरोप लावण्यात आलेत, ज्यासाठी त्यानं माफी मागितलेली. गायिका चिन्मयी श्रीपादानं ट्विटरवरुन अनेक आरोप केलेत, ज्यात तिनं दीक्षितवर स्टुडिओमध्ये लैंगिक छळाचा आरोप केला. एका महिलेनं आरोप केलाय की, रेकॉर्डिंगनंतर दीक्षितनं तिला ओढलं आणि चेकवर सही करताना किस करायलाही सांगितलं. त्यानंतर ती रडत रडत पळून गेली. रघु दीक्षितनं ताबडतोब जाहीर माफी मागितलेली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2 लग्न, 4 अफेअर्स अन् 2 लिव-इन रिलेशनशिपनंतरही 'ही' अभिनेत्री एकट्यानं जगतेय आयुष्य; प्रेमभंगानंतर दारूच्या नशेड बुडवलं करिअर