Bollywood Actress Life Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आजवर अनेक दिग्गज अभिनेत्रींनी नशीब आजमावलं, प्रसिद्धीझोतातही आल्या, पण काही ना काही कारणामुळे त्यांना इंडस्ट्री सोडावी लागली. तर अनेकजणींनी प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असूनही या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबाबत सांगणार आहोत. जिनं टेलिव्हिजनचा पडदा गाजवलाच, पण त्यासोबतच रुपेरी पडदाही गाजवला. सिनेसृष्टीतील तिची कारकीर्द दणक्यात सुरू होती, पण त्याचवेळी तिला वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. तिनं पडद्यावर लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र तिचा प्रवास सोपा नव्हता. 

Continues below advertisement


आम्ही कुनिका सदानंदबद्दल (Kunickaa Sadanand) बोलत आहोत. कारकि‍र्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना, तिनं दोनदा लग्न केलं, पण दोन्ही वेळा घटस्फोट झाला. नंतर, तिनं लिव्ह-इन रिलेशनशिपद्वारे जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी, नशिबाची योजना वेगळीच होती. वारंवार मनाला होणाऱ्या वेदना तिला सांत्वनासाठी दारूकडे नेत होत्या. तरीही, ती तिच्या संघर्षांवर मात करून खंबीरपणे उभी आहे. 


एका ब्रेकअपनंतर पूर्णपणे तुटलेली 


बिग बॉस 19 मध्ये प्रणीत मोरे, गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये, कुनिकानं तिच्या वैयक्तिक संघर्षांबद्दल आणि भावनिक प्रवासाबद्दल मोकळेपणानं सांगितलं. आपल्या निडर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुनिका सदानंदनं तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ सांगण्यास अजिबात संकोच केला नाही. जेव्हा मृदुल तिवारीनं तिला एका चांगल्या आणि एका वाईट सवयीबद्दल विचारलं, तेव्हा कुनिकानं कबुल केलं की, "मी ड्रग्ज घेत नाही, पण एक काळ असा होता, जेव्हा मी खूप मद्यपान करायचे... ब्रेकअपनंतर, मी भावनिकदृष्ट्या निराश झालेले. माझं वजन वाढलेलं आणि डबिंग सेशनदरम्यान, मी स्वतःकडे पाहायचे आणि विचार करायचे की, 'मी स्वतःचं काय केलंय?"


"मी दुपारी बियर प्यायचे आणि रात्री नाईट क्लबमध्ये जायचे..."


कुनिका सदानंद पुढे बोलताना म्हणाली की, "सुट्टीच्या दिवशी मी दुपारी बिअर पिऊन रात्री नाईटक्लबमध्ये जायचे. ते जवळजवळ एक व्यसनच बनून गेलेलं. माझे वडील मला ताकीद द्यायचे, "दुसऱ्याच्या पैशानं कधीही दारू पिऊ नकोस..." एक गमतीशीर पण हृदयाला स्पर्श करुन जाणारा किस्सा सांगताना कुनिका सदानंद म्हणाली की, "मी एकदा एका डिनर डेटवर गेलेले, जिथे त्या पुरूषांनी 20 हजार रुपयांचं शॅम्पेन ऑर्डर केलेलं. काही दिवसांनी, ते किती महाग आहे आणि त्यांनी किती पैसे दिले आहेत, याबद्दल ते बढाई मारत होते. तेव्हा मला कळलं की, मी फक्त त्यांचा अहंकार पूर्ण करण्यासाठी मदत करतेय. पुढच्या वेळी जेव्हा कोणी मला जेवणासाठी आमंत्रित केलं, तेव्हा मी स्पष्ट सांगून टाकलं की, "मी येणार नाही..."


"मी कधीच कोणत्याच अभिनेत्याला डेट केलं नाही..."


आपल्या लव्ह लाईफबाबत सांगताना कुनिका सदानंदनं खुलासा केला की, "मी दोन लिव-इन रिलेशनशिप, चार रोमान्स आणि दोन लग्न केलीत... त्यामुळे मला वाटतं की, वयाच्या साठीपर्यंत माझ्यासाठी खूप झालं..." जेव्हा गौरव खन्नानं विचारलं की, तिनं कधीच एखाद्या अभिनेत्याला डेट केले आहे का, तेव्हा कुनिका म्हणाली की, "कधीही नाही. मी कधीही एखाद्या अभिनेत्याला डेट केलेले नाही. बहुतेक अभिनेत्यांमध्ये समस्या अशी आहे की, ते स्वतःवर खूप प्रेम करतात. ते इतके आत्ममग्न असतात की, इतर कोणावरही प्रेम करायला जागाच राहत नाही, विशेषतः मोठ्या अभिनेत्यांसाठी!"


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ना शाहरुख, ना बिग बी; 'हा' बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती, जो तीनदा झालेला दिवाळखोर, आज दिग्गजांना पाजतोय पाणी