मुंबई : बऱ्याच दिवसांपासून 'रघु 350' चित्रपटाबाबत चर्चा सुरु होत. या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारा पाठमोरा तरुण नेमका आहे तरी कोण? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर हे गुपित आज उलगडलं आहे. अखेर चित्रपटाच्या थाटामाटात संपन्न झालेल्या फर्स्ट लूक आणि संगीत अनावरण सोहळ्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासोबतच चित्रपटात धुमाकूळ घालण्यास सज्ज असलेल्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. सोशल मीडियावर 'रघु 350' चित्रपटाचं मोशन पोस्टरही समोर आलं आहे. 


कॉलेजचे जिवलग मित्र राजकारणात होणार वैरी?


अर्थात पोस्टरवर पाहिल्याप्रमाणे चित्रपटात दमदार ऍक्शनची पाहायला मिळणार आहे. अॅक्शनसोबत चित्रपटात रोमान्सचा तडकाही असणार आहेत असं कळतंय. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते, तानाजी गलगुंडे, संजय खापरे आणि अभिनेत्री अदिती कांबळे हे कलाकार मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाले आहेत. पोस्टरवरून चित्रपटाची कथा उलगडण्यास कठीण जात असलं तरी येत्या 2 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट पाहता येणार आहे. 


'रघु 350' चित्रपटात मिळणार का मैत्रीची मिसाल? 


नुकताच चित्रपटातील कलाकार मंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फर्स्ट लूक आणि संगीत अनावरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला. चित्रपटातील दमदार गाणी नक्कीच थिरकायला भाग पाडतील यात शंका नाही. कॉलेजपासून सुरू झालेलं राजकारण कसं गावापर्यंत पोहोचलं आणि खरे मित्र वैरी कसे झाले, याची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता रघु 350 चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'रघु 350' पाहा 2 ऑगस्टला जवळच्या सिनेमागृहात


'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु 350' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. याशिवाय, आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली असून चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची बाजू आश्विन भंडारे आणि ओंकार स्वरूप यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटात असणाऱ्या रोमँटिक अशा गाण्यांना आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि ओंकार स्वरूप यांनी त्यांचा सुमधुर आवाज दिलेला पाहायला मिळत आहे. येत्या 2 ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nana Patekar : शूटींगदरम्यान आगीत गंभीर होरपळले होते नाना पाटेकर, पापण्या आणि दाढीलाही लागली होती आग; 'तो' किस्सा वाचा