Radhika Bhide Playback Singing With Renuka Shahane: आपल्या गोड गळ्यानं आणि सोज्वळ हावभावांनी 'मन धावतंया' (Mann Dhaavataya) असं सांगून अवघ्या सोशल मीडियाला (Social Media) वेड लावणारी राधिका भिडे (Radhika Bhide) सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. अशातच आता राधिका भिडेचं नशीब चमकलं असून तिला खूप मोठी संधी मिळाली आहे. गोड गळ्याच्या, सुंदर, सोज्वळ राधिका आता लवकरच पार्श्वगायिका म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) अभिनीत 'उत्तर' सिनेमातून (Uttar Movie) राधिका भिडे पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणार आहे.  

Continues below advertisement

सध्याचा भारतभर गाजणारा , तरूणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे 'मन धावतंया' फेम राधिका भिडे. याच राधिकानं गायलेलं पहिलंवहिलं मराठी चित्रपट गीत 'हो आई!' सध्या चांगलंच व्हायरल होतंय.  'उत्तर' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या या प्रमोशन गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि  'तू आहेस म्हणून मी आहे' ही भावना सोप्या शब्दांत आणि गोड चालीत उलगडली आहे. 'उत्तर' चित्रपटाच्या टीजरनं रसिकांची उत्सुकता वाढली असतानाच 'हो आई' हे गाणं ती आतुरता अधिकच वाढवणारं आहे. 

'हो आई' गाण्याचे बोल सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांचे असून यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन या जोडीनं 'मन धागा धागा जोडते नवा', 'माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं' आणि 'तुला जपणार आहे' यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्यांचं हळूवारपण जपणारं , अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं 'हो आई!' हे नवं गाणं 'उत्तर' या चित्रपटाच्या निमित्तानं नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबद्दलची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधुर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील असं हे गाणं प्रत्येकाला आपल्या आईला 'थँक यू' म्हणण्याची संधी देणारं निश्चितच आहे.  

झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या 'उत्तर'या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर व जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 12 डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

राधिका भिडेनं गायलेलं गाणं ऐकलंत का? 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan New Home Video Viral: अजितदादांनी गुलिगत स्टार सूरज चव्हाणला पत्र्याच्या घरातून अलिशान बंगल्यात आणलं; गृहप्रवेशाचा व्हिडीओ पाहून म्हणाले...