Radha-Sagars Comic Chemistry Goes Viral: बिग बॉस मराठी सिझन 6ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे.  दरम्यान, पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडली होती. एकीकडे वादाची ठिणगी पडली आहे, तिथेच दुसरीकडे राधा आणि सागर यांच्यातील मजेशीर जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दोघांची जुगलबंदी पाहून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे. या दोघांनी 'सासू आणि सून' यांचे रूप धारण करत घरातील सदस्यांना चांगलेच हसवले आहे. 

Continues below advertisement

राधा-सागरचा 'सासू -सून' ड्रामा  रंगणार. मजेशीर संवादांनी घरात पिकला हास्याचा मळा

राधा आणि सागरची जुगलबंदीला प्रेक्षकवर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  राधाने मजेशीररित्या सासूची भूमिका साकारली आहे. ती आपल्या सुनेच्या (सागरच्या) आणि घरातील इतर 'मॉडर्न सुनांच्या' तक्रारी करताना दिसत आहे. राधाच्या अस्सल मालवणी ढंगातील संवादफेकीने यामध्ये अधिकच रंगत आणली आहे.

दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला?

राधा (सासूच्या भूमिकेत): "ह्या पोरी जरा कामाला मदत करत नाहीत, मी सगळं घर किती सांभाळू?" हुकूम देत असतात. आणि तो सागऱ्या ... संपलं असेल तर जेवायला वाढा चला!

Continues below advertisement

राधा : या नवीन मॉर्डन  सुना आल्या आहेत, याना काही वळण नसल्यासारखं... अहो, "आमचं तर नाचकामच बंद पडल्यासारखा झालाय!" काय सांगू अजून... 

यानंतरही दोघांमध्ये  संभाषण झाले. सध्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करून हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता दर्शवली

घरात हास्याची कारंजी!

 

 

या संवादावर घरातील इतर सदस्यही पोट धरून हसताना दिसले. राधाची ही वेगळी शैली आणि सागरची तिला मिळालेली साथ यामुळे तणावाच्या वातावरणात काही काळ आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सध्या घरातील दोघांचा घरातील व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.  दोघांची केमिस्ट्री पाहून अनेकांना हसू अनावर झाले आहे. या एपिसोडची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शाहिद कपूरच्या ओ रोमिओ चित्रपटात झळकणार 2 मराठमोळे कलाकार; एक गायक तर, दुसरा..., ट्रेलर पाहिलात का?

अफगाण क्रिकेटपटूकडून बॉर्डर 2चं प्रोमोशन; VIDEO शेअर करत चित्रपट बघणार असल्याचं सांगितलं, बॉलिवूड कलाकारांची प्रतिक्रिया व्हायरल