Pushpa Star Rashmika Mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने खूप चर्चेत आहे. पुष्पा या चित्रपटानंतर साऊथ अभिनेत्री रश्मिका आता नॅशनल क्रश बनली आहे. रश्मिका मंदान्ना हा साऊथ सिनेसृष्टीतला मोठा चेहरा आहे. त्यामुळेच तिला बॉलिवूडमध्येही अनेक स्टार्सबरोबर काम करण्याच्या ऑफर आल्या होत्या, ज्या तिने फेटाळून लावल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याबरोबर काम करण्यास रश्मिकाने नकार दिला आहे.


कार्तिक आर्यन


या यादीत पहिले नाव आहे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे. वास्तविक, रश्मिका मंदान्नाने 'किरिक पार्टी' चित्रपटाद्वारे साऊथ इंडस्ट्रीत पहिले पाऊल ठेवले. हा चित्रपट हिट झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याची हिंदी व्हर्जन बनविण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी निर्मात्यांना रश्मिकाला कार्तिक आर्यनबरोबर साईन करायचे होते. मात्र, रश्मिकाने यासाठी नकार दिला. खरंतर रश्मिकाने कार्तिकमुळे नाही तर त्याच प्रकारचे रोल पुन्हा केल्यामुळे नकार दिला.


शाहिद कपूर


दुसरे नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर. शाहिद कपूरचा चित्रपट 'जर्सी' रिलीजसाठी सज्ज आहे. जर्सीमध्ये शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की जर्सी चित्रपटासाठी निर्मात्यांना रश्मिकाला साईन करायचे होते, पण तिने या भूमिकेस नकार दिला.


रणदीप हुडा


रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रणदीप हुड्डा आणि रश्मिका मंदान्ना यांना एकत्र चित्रपट बनवायचा होता, पण रश्मिकाने नकार दिला. यानंतर हा चित्रपट स्थगित करण्यात आला.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha