Allu Arjun Vanity Van Price :

  सध्या पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या चित्रपटाने लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या चित्रपातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अल्लू अर्जुननं 50 कोटी रूपये मानधन घेतलं होते. अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणयासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अल्लू अर्जुनकडे आलिशन व्हॉनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटी व्हॅनची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. जाणून घेऊयात या  व्हॅनिटी व्हॅनबद्दल-


अल्लू अर्जुनने ही  व्हॅनिटी व्हॅन 2019 मध्ये खरेदी केली होती. या ब्लॅक कलरच्या या व्हॅनिटी व्हॅनचं नाव 'द फाल्कन' असं आहे.  5 स्टार हॉटेलपेक्षा आलिशान असणाऱ्या अल्लू अर्जुनच्या या व्हॅनिटी व्हॅवची किंमत सात कोटी रूपये आहे. 






एवढच नाही तर अल्लू अर्जुनकडे लग्झरी कार्सचं कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे Hummer H2, रेंज रोव्हर वोग, वॉल्वो XC90 T8 या गाड्या आहेत. कार्सबरोबरच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. या प्रायव्हेट जेटमधून फिरतानाचे फोटो अल्लू अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचं आलिशान घर हे हैद्राबाद येथे आहे. त्याच्या या घराची किंमत 100 कोटी रूपये आहे. 


संबंधित बातम्या


Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला


Republic Day 2022 Song : बॉलिवूडमधील ‘ही’ देशभक्तीपर गाणी ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील