Pushpa 2: The Rule: अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) आणि फहाद फासिल (Fahadh Faasil) यांचा 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. अल्लू अर्जुनच्या स्टारडमनं प्रेक्षकांना पार वेड लावलं आहे. पण, दुसरीकडे याच अल्लू अर्जुनच्या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रेक्षकांनी खूप पैसे भरून तिकीटं विकत घेतली आणि 'पुष्पा 2: द रूल' पाहायला गेले. अपेक्षेप्रमाणे पिक्चर सुरूही झाला. पण इंटरवलवेळी मोठ्या पडद्यावर 'THE END' चा बोर्ड झळकला. प्रेक्षक हैराण झाले. अर्धाच पिक्चर दाखवल्यामुळे धोका मिळाल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आणि सर्वांच्या मनात संतापाची भावना उसळली. हा सर्व प्रकार घडला कोच्चीच्या सिनेपोलिस सेंटर स्क्वेअर मॉल थिएटरमध्ये. 


पुष्पा 2 मुळे अल्लू अर्जुनच्या स्टारडमपुढे आभाळंही ठेंगणं झालं आहे. पण, त्याच अल्लू अर्जुनचा जलवा अनुभवायला गेलेल्या कोची येथील प्रेक्षकांना फारच वेगळा अनुभव आला आणि त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्याचं झालं असं की, कोचीच्या सिनेपोलिस सेंटर स्क्वेअर मॉल चित्रपटगृहात अशी चूक झाली की, प्रेक्षक संतप्त झाले. काहींनी पैसे परत मागितले तर काहींनी चित्रपट पुन्हा दाखवावा असं सांगितलं. 


मीडिया रिपोर्टनुसार, कोचीमधील एका थिएटरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता 'पुष्पा 2' चा शो सुरू होता. इंटरव्हल झाला आणि मोठ्या पडद्यावर चित्रपटाचं एंड क्रेडीट दाखवलं जाऊ लागलं. हे पाहून प्रेक्षकांचा गोंधळ उडाळा, काही वेळातच त्यांना समजलं की, आपण पाहिलेला चित्रपटाचा फर्स्ट हाफ नाहीतर, सेकंड हाफ होता. थिएटरमध्ये प्रेक्षकांना तब्बल 3 तास 20 मिनिटांच्या या चित्रपटाचा पहिला भाग नाही तर दुसरा भाग दाखवण्यात आला. 


मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रेक्षकांनी चुकीसाठी पैसे परत मागितले, तर काहींनी चित्रपटाचा पहिला पार्ट पुन्हा दाखवण्याची मागणी केली. नंतर दबावाखाली थिएटर व्यवस्थापनाला नमतं घेत रात्री 9 वाजता चित्रपटाचा पहिला भाग दाखवावा लागला. थिएटरमध्ये फक्त 10 प्रेक्षक होते, कारण बाकीचे सगळे निघून गेले होते. त्यानंतर थिएटर प्रशासनानं प्रेक्षकांना पैसे परत करण्याचं आश्वासनही दिलं होतं.


'पुष्पा 2'ची एक झलक 



बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'ची त्सुनामी


'पुष्पा 2' या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांत हिंदीत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं, तर तो 600 कोटींवर पोहोचला आहे. हा सिनेमा 400 ते 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. पहिल्याच दिवशी त्यानं 164.25 कोटींची कमाई केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pushpa 2 Box Office Collection Day 4: 'पुष्पा 2'नं फक्त चारच दिवसांत पार केलं 'बाहुबली', 'गदर 2'चं लाईफटाईम कलेक्शन; आतापर्यंत एकूण गल्ला किती कोटींचा?